आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 तासांत 3 अपघात, 4 ठार; चालक पसार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवारी सायंकाळपासून ते बुधवारी सकाळपर्यंत सुमारे १० तासांत शहर आणि परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये जणांना आपले प्राण गमवावे लागले. दुर्दैवाची बाब म्हणजे तीनही अपघातांत धडक देणाऱ्या वाहनांचे चालक मदत करण्याऐवजी जखमींकडे दुर्लक्ष करून पळून गेले. वेळीच जखमींना उपचारार्थ दाखल केले असते तर काहींना जीवदान मिळू शकले असते.

दांपत्यांना धडक
तुळजापूर रस्त्यालगतच्या मशरूम गणपती ते पसारे वस्ती मार्गावर पायी जाताना वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसली. त्यामुळे वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात बुधवारी सकाळी साडेसहाला घडला. अपघातानंतर वाहनचालक तसाच निघून गेला. पहाटेच्या सुमाराला रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे काही काळ दोघेजण जखमी अवस्थेतच पडले होते. निर्मला केशव घोडके (वय ६०), केशव बलभीम घोडके (वय ६८, रा. दोघे कीर्ती नगर, शेळगी शिवार, सोलापूर) या दोघांचा मृत्यू झाला.
मशरूम गणपतीजवळ वास्तव्यास असणाऱ्या मुलाच्या घरी तुळशीपूजन असल्याने दोघेजण मंगळवारी इकडे अाले होते. रात्री कार्यक्रम झाल्यानंतर मुलाकडे राहिले. सकाळी साडेसहाला ते तेथून जवळ असलेल्या अापल्या घराकडे जात असता पाठीमागून वेगाने अालेल्या वाहनाने दोघांना ठोकरले. सकाळी सातच्या सुमाराला काही तरुण फिरायला जाताना ही घटना पाहून त्यांना शासकीय रुग्णालयात अाणले. जोडभावी पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू असल्याची माहिती फाैजदार शिवाजी राठोड यांनी दिली.

सिमेंटट्रकने उडवले
बाळेपुला वरून जाताना पाठीमागून सिमेंट ट्रकची (एमएच १३ एफझेड ७४६६) धडक बसून रमेश शामराव पाटील (वय ५०, रा. हत्तूर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेनऊला घडला. त्यांच्यावर खासगी रुग्णालात उपचार सुरू असता रात्री अकराला मृत्यू झाला. बळे येथे वास्तव्यास असणाऱ्या चुलत बहीणला भेटण्यास ते बुलेटवर (एमएच १३ के १९२७) जात होते. अपघातानंतर चालक पळून गेला. फाैजदार चावडी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर उपचारास दाखल केले. उपचार सुरू असताना रमेश पाटील यांचा मृत्यू झाला.

हगलूर जवळ दुर्घटना
हगलूर जवळील पेट्रोल पंपजवळून पायी जाताना वाहनाची धडक बसून ३५ वर्षीय तरुणाचा मुत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री झाला असून मृताची अद्याप अोळख पटली नाही. अपघातानंतर चालक तसाच निघून गेला.