आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ बचत गटांच्या 24 महिलांना 21 लाखांचा गंडा; महिलांच्या नावे काढले प्रत्येकी 75 हजार कर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एका दांपत्याने प्रलोभने देत २४ महिलांना सुमारे २१ लाखांना गंडवले. या दोघांनी विविध बचत गटाच्या माध्यमातून या महिलांच्या नावे २१ लाखांचे कर्ज काढले. त्यापोटी कमिशन देऊ केले. रक्कम घेऊन सोलापुरातून पलायन केले. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत. 


सरवदे नगर परिसरात सर्व कामगार वर्ग आहे. येथे विडी कामगार आणि टॉवेल कारखान्यात कामाला जाणारा वर्ग राहतो. सहा ते सात वर्षापूर्वी येथील महिलांनी बचत गट सुरू केले. प्रथम सुरुवात झाली ती दहा हजार रुपयांच्या कर्जाने. यानंतर आकडा वाढत वाढत गेला. जेवढी गरज होती तेवढी रक्कम या महिलांनी घेतली. यानंतर सायरा शेख हिच्या मध्यस्थीने कर्ज प्रकरणे वाढत गेली. कर्ज प्रकरण मिळवून देण्यासाठी सायरा शेख ही पाचशे रुपये कमिशन घेत होती. तेव्हा याच परिसरात राहणारी सनाबेगम आणि म. हनीफ शेख यांनी प्रलोभने दिली. प्रथम कर्जाची परतफेड व्यवस्थित झाली. मात्र परतफेड केली नाही. 


फिर्यादला वेळ लागतोच
पहिल्या दिवशी महिला बचत गटाचे नाव सांगायला तयार नव्हते. सविस्तर माहिती देत नव्हते. दुसऱ्या दिवशी तपशीलवार फिर्याद द्यायला तयार झाल्या. त्या सर्व महिलांकडून माहिती घेण्यास वेळ लागतोच. जेव्हा पहिल्या दिवशी महिला आल्या होत्या तेव्हा संशयित आरोपीचे मोबाइल नंबर घेऊन तपासासाठी पथक पाठवण्यात आले आहे.
- कमलाकर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 


बचतगटांची नावे आणि कार्यपद्धती 
फिनो,एक विटास, व्हिजन, एसकेएस, तरसना, साई महिला, इन्डीट्रेड, शारदा, ऐश्वर्या या बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे कर्ज घेण्यात आले. कर्ज घेताना ते दहा हजाराचे असो किंवा ७५ हजाराचे असो. प्रत्येकवेळी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, वीज बिल, बॅँक खाते या सर्वांचे झेरॉक्ससह शंभर रुपयांचे बॉन्ड लाभार्थ्यांच्याकडून घेतले जात होते. त्या बॉन्डवर काय मसुदा लिहिला आहे हे एकाही लाभार्थ्याला माहीत नसायचे किंवा याचे एक झेरॉक्ससुद्धा कोणाकडे नाही. ही सर्व कागदपत्रे बचत गटाच्या कार्यालयातच असायची. संबंधित बचत गटाचे कार्यालय कोणालाच माहीत नाही. बचत गटाचा एक माणूस दर आठवड्याला येतो आणि कर्ज देणे आणि परतफेडीचे हफ्ते घेऊन जातो.

 
पोलिसांना होईल सहकार्य 
सनाबेगमशेख ही महिला आपल्या पतीसह पलायन केल्यानंतर सरवदे नगर येथील सर्वजण तिला मोबाइलवर संपर्क करण्यासाठी सारखे प्रयत्न करत होते. बुधवारी सकाळी एका तरुणाचा फोन तिला लागला आणि तिने फोन उचलला. तेव्हा शिवीगाळ करण्यात आली. यानंतर तिने मोबाइल बंद केला. नंतर चालू केला मात्र फोन उचलत नाही. यावरून त्या मोबाइल नंबर वरून लोकेशन काढून आरोपी पकडण्यात सहकार्य मिळेल. 


रक्कम आणि कर्जदार महिलांची संख्या 
१८ महिलांच्या नावावर ७५ हजार, प्रत्येकी तीन अशा नऊ जणांच्या नावावर २५ हजार आणि ३० हजार, १४ जणींच्या नावावर २५ हजार, चौघींच्या नावावर पाच हजार, एकीच्या नावावर १८ हजार आणि १० जणींच्या नावावर प्रत्येकी २० हजार रुपयांचे कर्ज आहे. 

बातम्या आणखी आहेत...