आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान भरपाईचे वाटप सुरू, शेतकऱ्यांना ४२ लाखांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने बार्शी पंढरपूर तालुक्यांतील १६८.६० हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले होते, त्यानुसार शासनाने ४२ लाख ९९ हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनास दिली आहे. हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून या रकमेचे तालुकास्तरावरून वाटप सुरू असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
मार्च महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने फळपिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये बार्शी अक्कलकोट तालुक्यात ५० टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाने शासनास कळविले होते. बार्शी तालुक्यात १३३ शेतकऱ्यांचे ७२.७० हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना फटका बसला होता. यामध्ये २० लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. अक्कलकोट तालुक्यातील ६५ शेतकऱ्यांचे ८५.९० हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांची हानी झाली होती. या नुकसानीपोटी २१ लाख ४८ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
तहसीलदारांकडे रक्कम वर्ग...
१९८ शेतकऱ्यांना फळपिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून ४२ लाख १६ हजार रुपये वाटप करण्यात येणार आहेत. यापूर्वी मदतीपोटी १७ लाख ८५ हजार रुपये देण्यात आले आहेत. शासनाकडून रक्कम मिळाल्याने २४ लाख ३१ हजार रुपये तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये अक्कलकोट तालुक्यासाठी १२ लाख ३९ हजार तर बार्शी तालुक्यासाठी ११ लाख ९२ हजार रुपये देण्यात आल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
जिथे नुकसान, तिथेच मदत देणार
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शासन आदेशानुसार ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान ज्याठिकाणी झाले आहे, त्याच ठिकाणचा अहवाल मदतीसाठी शासनाला पाठविला आहे. पंचनामे करतानाच ५० टक्केपेक्षा अधिक कमी अशा प्रकारे पंचनामे करण्यात आले आहेत. यामुळे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बार्शी अक्कलकोट तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...