आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४३७ विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अकरावी प्रवेशासंदर्भातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाची पर्यायी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. अकरावी शास्त्र वाणिज्य शाखेकरता तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळाला नाही अशा ४३७ विद्यार्थ्यांना आज प्रवेश देण्यात आला आहे. आणखी शास्त्र वाणिज्य शाखेतील हजार जागा रिक्त असून ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही, त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी यादीनुसार शहरातील ३२ महाविद्यालयांत ४३७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये शास्त्र शाखेला २८५ तर वाणिज्य शाखेला १०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याशिवाय उर्दू महाविद्यालयात ४८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. सोशलमध्ये वाणिज्य शाखेला १३, बीक्यूकेमध्ये शास्त्र शाखेला १८, पानगलमध्ये शास्त्र शाखेला १२ तर राजेभाई महाविद्यालयात शास्त्र शाखेला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.मंगळवारी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत सुतार यांनी दिली.

येथे आहेत जागा
एसईएसकनिष्ठ महाविद्यालय, गांधी नाथा रंगजी महाविद्यालय, गंगूबाई केकडे महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, ज. रा. चंडक महाविद्यालय, बाळे, रखमाबाई हत्तुरे महाविद्यालय, हत्तुरे वस्ती या महाविद्यालयांत वाणिज्य शास्त्र शाखेच्या जागा रिक्त अाहेत.
बातम्या आणखी आहेत...