आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४६ नवीन सिटीबस वापरण्यास अपात्र, आरटीओ तपासणीनंतर अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- केंद्राच्या जेएनयूआरएम योजनेतून महापालिका परिवहन विभागात २०० बस मंजूर झाले. त्यापैकी १४४ जनबस आल्या आहेत. त्यातील अशोक लेलँड कंपनीच्या ९९ बसपैकी ८१ बसच्या चेसी क्रॅक झाल्याची बाब परिवहन विभागाच्या कर्मशाळा व्यवस्थापकांनी दृष्टीस आणून दिली. त्यानुसार बसची तांत्रिक तपासणी आरटीओ विभागाकडून करण्यात येत आहे.
शनिवारी ४६ बसची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल महापालिका परिवहन विभागास आरटीओ अधिकारी उदय साळुंके यांनी सायंकाळी दिला आहे. चेसी क्रॅक असल्याने बस सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस वापरता येणार नाही. या बसची योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा अहवाल आरटीओ विभागाने िदला. आठ महिन्यांपूर्वी नवीन बस आल्या होत्या. त्या बस नागरिकांच्या हिताचे नसल्याने ते बस रस्त्यावर धावणार नाहीत. अन्य बस रस्त्यावर आणू पण प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.
केंद्राच्या जेएनयूआरएम योजनेअंतर्गत महापालिका परिवहन विभागात १८५ बस खरेदीस मंजुरी मिळाली. तसा करारही मनपा आणि अशोक लेलँड कंपनीत झाला होता. त्यानंतर १४५ बस परिवहन ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. उर्वरित बस टप्प्याने दाखल होत आहेत. दरम्यानच्या काळात बसचा दर्जा आणि तोटा पाहून नवीन बस घेण्याचा निर्णय परिवहनने घेतला. तसा ठरावही केला. दुसरीकडे करारानुसार उर्वरित १५ बस कंपनीने पाठविल्या आहेत. मात्र, परिवहन बस घेण्यावर ठाम असल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर येथील कंपनीच्या गोदामात या बस उभ्या आहेत.

चेसी क्रॅक असल्याचे लक्षात आल्यानंतर तांत्रिक बाजू जाणून घेण्यासाठी आरटीओ तज्ज्ञाकडून अहवाल मागवला. अहवालानंतर ४६ बस यापुढे वापरणार नाही. अन्य बस रस्त्यावर आणू. प्रवाशांची गैरसोय होणार नाही. विजयकुमारकाळम-पाटील, मनपाआयुक्त
मिनी बस (अशोक लेलँड)
जन बस (अशोक लेलँड)

१४४ एकूण आलेल्या बस मिनी बस (अशोक
लेलँड)
३५ जन बस (अशोक
लेलँड)
१४५ व्हॉल्व्हो मंजूर बस

मनपा बस खरेदी योजना
यापुढील बस घेण्याचा सभागृहात ठराव झाला आहे. त्यामुळे अशोक लेलँड कंपनीच्या बस घेण्याबाबत आता निर्णय नाही. मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला आहे.'' प्रदीपखोबरे, माजीपरिवहन व्यवस्थापक

अशोकलेलँड कंपनीच्या बसची खरेदीची चौकशी करावी. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बस असल्याचा अहवाल आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला. मुद्रांक शुल्कापोटी कंपनीने मनपाकडे १२ लाख रुपये जमा केले.'' अनिलकंदलगी, विरोधीपक्षनेते
व्हॉल्व्हो - १०
जन बस (अशोक लेलँड) - ४६
एकूण - ५६
गोदामात असलेल्या बस
जनबस (अशोक लेलँड) - १४ (सुमारे)
रद्द झालेल्या बस
मिळाले
४९.३० कोटी मंजूर
९८.५९ कोटी
योजनेसाठी निधी
येणे बाकी - ४९.२९ कोटी