आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉल्वोसह ४७ सिटीबस जाऊ शकतात भंगारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोठागाजावाजा करत केंद्राच्या जेएनयूआरएम योजनेतून १० व्हाॅल्वो बससह २०० सिटी बस महापालिका परिवहन उपक्रमात दाखल झाल्या. त्यापैकी सहा व्हाॅल्वो बस दुरुस्तीसाठी मागील महिन्यांपासून बंद आहेत. या गाड्या असेच बंद राहिल्यास भंगारात काढण्याची वेळ येऊ शकते. तसेच, पाच वर्षांपूर्वी आणलेल्या ४१ मिनी बस किरकोळ दुरुस्तीच्या नावाने सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या गाड्या भंगारात काढण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दरम्यान, परिवहनचा प्रतिकिमी खर्च ३५ रुपये तर उत्पन्न २९ रुपये इतके आहे. प्रतिकिमी रुपये प्रमाणे रोज १.६२ लाख तर प्रतिमहा ४८.६० लाख रुपयांचा तोटा परिवहनला होत आहे.

जुन्यागाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी १८ लाख हवेत
महापालिकापरिवहन उपक्रमासाठी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक अजित खंदारे यांच्या कार्यकाळात खरेदी केलेले मिनी बस किरकोळ दुरुस्तीसाठी बंद आहेत. या गाड्यांना सध्या टायर नाहीत. टायरसह १८ लाख रुपये दुरुस्तीसाठी लागणार आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. नवीन बस असल्याने त्या रस्त्यावर धावत आहेत. अप्रत्यक्षपणे जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या हालचाली सुरू आहेत.

२१४ कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्रस्ताव
महापालिकापरिवहन विभागाकडे १८६ बस असून त्यापैकी १२० ते १२५ बस मार्गावर धावतात. मनुष्यबळ नसल्याने अन्य बस थांबून आहेत. घेतलेल्या कर्मचाऱ्यांसह परिवहन खात्यातील १०७ वाहक १०७ चालक गैरहजर आहेत. त्यांना काढण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडून तयार करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी दिली.
रोज डिझेलसाठी खर्च लाख रुपये

रोज बस धावतात - २७ हजार किमी
प्रतिकिमी तोटा
लाख दरमहा तोटा
प्रतिकिमी उत्पन्न
लाख रुपये प्रमाणे ताेटा
प्रतिकिमी खर्च
~ 0६
~ ४८.६
~ २९
~ १.६२
~ ३५

पाच लाख रुपयांसाठी व्हॉल्वो बस आहेत बंद
व्हॉल्वोकंपनीकडून दहा वातानुकूलित बस खरेदी करण्यात आल्या. त्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती कंपनीने नियमानुसार एक वर्ष के ली. त्यानंतर आकारणी सुरू झाली. आता सहा बस बंद आहेत. दुरुस्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्काळ पाच लाख रुपये आवश्यक आहेत. अन्यथा मनपा आरोग्य विभागातील रोड स्वीपरप्रमाणे व्हॉल्वो बसही भंगारात निघतील.

- ४१ बस दुरुस्तीसाठी १८ लाख तर व्हॉल्वो दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांची गरज आहे. प्रतिकिमी रुपये तोटा होत आहे. नेमणूक केलेले कर्मचारी गैरहजर आहेत. त्यांना काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. प्रदीपखोबरे, मनपा परिवहन व्यवस्थापक
२५ किमीपेक्षा लांबच्या गावांसाठी : बससेवासुरू केल्याने एसटीचे पत्र शहरापासून २५ किमी पर्यंत सिटी बस सेवा देण्याचा अधिकार मनपा परिवहन विभागाला आहे. त्यापेक्षा जास्त अंतर असलेले नळदुर्ग, हैद्रा, अनगर या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत एसटी महामंडळाने आरटीओला पत्र लिहून कळवले आहे. त्याची प्रत माहितीस्तव परिवहन विभागाला प्राप्त झाली.
बातम्या आणखी आहेत...