आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वऱ्हाडाच्या जीपला टँकरची धडक; साेलापूरचे पाच जण जागीच ठार; 3 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त क्रूझर. - Divya Marathi
अपघातग्रस्त क्रूझर.

वैराग (जि. सोलापूर)- कर्नाटकातील कलबुर्गी-हुमनाबाद महामार्गावर वऱ्हाडाची क्रुझर जीप आणि टँकरच्या समोरासमोर झालेल्या अपघतात बार्शी तालुक्यातील वैराग येथे पाच जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. जखमींना कलबुर्गी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांत बाप आणि लेकाचा समावेश आहे.


आनंद बाबासाहेब शीलवंत (३८), गंगाधर महादेवअप्पा शीलवंत (७०), वडील भीमाशंकर  ऊर्फ सिद्धू बाबूराव शीलवंत (४०), मुलगा उज्ज्वल शीलवंत  (११), आणि प्रज्वल विजय तुगावकर  (१६, सर्व रा. वैराग, ता. बार्शी) अशी मृतांची नावे अाहेत.   


महारुद्र शीलवंत यांच्या मुलीचा विवाह मंगळवारी कलबुर्गी येथे  होता. त्यासाठी विवाहाला वैराग येथून वऱ्हाडाच्या चारचाकी गाड्या गेल्या होत्या. त्यापैकी क्रुझर (एमएच ४५ : ७८७८) या गाडीचा कलबुर्गीपासून सात किलोमीटर अंतरावर कलबुर्गी-हुमनाबाद महामार्गावर टँकरसोबत अपघात झाला. यात क्रुझरमधील पाच जण जागीच ठार झाले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...