आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात अॅसिड पडून पाच जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अपघाताने ड्रम पडल्याने उडालेल्या सल्फ्युरिक अॅसिडने पाचजण होरपळून निघाले. यापैकी दोघे तरुण आणि एक मुलगी जास्त जखमी झाले. तर दोघा महिलांवर अॅसिडचे थेंब उडाल्याने त्वचा भाजून निघाली. तर एकीच्या डोळ्यातही गेले आहे. जखमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून सर्वांची स्थिती धोक्याबाहेर आहे. 
 
उमानगरी येथे सोमवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. ज्ञानेश्वर हरिदास अवताडे-पाटील (वय २६), योगेश संभाजी अवताडे-पाटील (वय २५), पूजा युवराज अवताडे-पाटील (वय १७), कल्पना दयानंद धनवे (वय ३५), प्रतिभा गायकवाड (वय ५०) या जखमी झाल्या. 
दोन्ही तळपाय भाजलेल्या योगेशने महिती दिली, की द्राक्षातील ड्रीप (ठिबक) साठी आणलेलं अॅसिडचे ड्रम सायकलवरुन स्कार्पिआेमध्ये ठेवण्यासाठी नेत होतो, मोठ्या गाडीचा दरवाजा उघडत असताना सायकलवरील ड्रम पडला अन्् फुटला. अॅसिड उडाल्याने अंगावरील कपडे जळाले. आग होऊ लागल्याने छोट्या बहिणीला उचललंल अन्् घराकडे पळालो. हौदातील पाण्याने तीला भीजवला, पाठीमागून आलेल्या भावाच्या अंगावर पाणी आेतलं, सर्वांना स्कार्पिआेमध्ये घालून दवाखान्यात आलो. विरवडे (ता. मोहोळ) येथे शेत आहे. १५ एकर द्राक्षबाग आहे. कुपनलिकेच्या पाण्यात क्षार जास्त असल्याने ड्रीप बंद पडतो. त्यामध्ये अॅसिड सोडल्यावर ते सुरळीत होतात. अनेक वर्षांपासून ड्रीपसाठी अॅसिड आणतो, असे योगेशने सांगितले. 

अॅसिड नेमके कशाचे? : ड्रीपसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅसिडची तीव्रता एवढी नसते. दूध डेअरीमध्ये फॅट तपासणीसाठी जास्त तीव्रतेचे सल्फ्युरिक अॅसिड वापरण्यात येते, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगण्याच्या अटीवर सांगितले. ड्रीपसाठी वापरण्यात येणारे अॅडिस सहज हाताळता येते. शरीराला त्याचा त्रास होत नाही. तीव्र अॅसिड दूध डेअरी किंवा इतर कोणत्या कारणासाठी आणले? अशा अॅसिडची वाहतूक करता येते का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. 
ड्रमसायकलवरुन स्कार्पिआेमध्ये ठेवण्यासाठी नेत होतो, मोठ्या गाडीचा दरवाजा उघडत असताना सायकलवरील ड्रम पडला अन्् फुटला. अॅसिड उडाल्याने अंगावरील कपडे जळाले. आग होऊ लागल्याने छोट्या बहिणीला उचललंल अन्् घराकडे पळालो. हौदातील पाण्याने तीला भीजवला, पाठीमागून आलेल्या भावाच्या अंगावर पाणी आेतलं, सर्वांना स्कार्पिआेमध्ये घालून दवाखान्यात आलो. 

विरवडे (ता. मोहोळ) येथे शेत आहे. १५ एकर द्राक्षबाग आहे. कुपनलिकेच्या पाण्यात क्षार जास्त असल्याने ड्रीप बंद पडतो. त्यामध्ये अॅसिड सोडल्यावर ते सुरळीत होतात. गेल्या अनेक वर्षांपासून ड्रीपसाठी अॅसिड आणतो, असे योगेशने सांगितले. 

अॅसिड नेमके कशाचे? 
ड्रीपसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅसिडची तीव्रता एवढी नसते. दूध डेअरीमध्ये फॅट तपासणीसाठी जास्त तीव्रतेचे सल्फ्युरिक अॅसिड वापरण्यात येते, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगण्याच्या अटीवर सांगितले. ड्रीपसाठी वापरण्यात येणारे अॅडिस सहज हाताळता येते. शरीराला त्याचा त्रास होत नाही. तीव्र अॅसिड दूध डेअरी किंवा इतर कोणत्या कारणासाठी आणले? अशा अॅसिडची वाहतूक करता येते का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. 

फिरायला निघालेल्या दोघी भाजल्या 
सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या कल्पना धनवे (वय ३५) प्रतिभा गायकवाड (वय ५०) यांच्याही अंगावर अॅसिड पडले. धनवे यांचा चेहरा, मान पाठीवर पडून भाजल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोळ्यातही अॅसिडचा काही अंश उडाल्याने जळजळ होत होती. अॅसिड उडाल्याने मान खांद्याचा भाग होरपळून निघाला आहे. 


अॅसिड हल्ला झाल्याची अफवा पसरल्याने पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अॅसिडचे नमुने घेतले. सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा चौगुले, अपर्णा गीते, सहायक आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
बातम्या आणखी आहेत...