आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 रुपये गैरव्यवहारासाठी निलंबन १५०० रुपये हडप, तर पुन्हा सेवेत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन विभागात पाच रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्याला निलंबित केले. दीड हजार रुपये हडप करणाऱ्याला मात्र पुन्हा सेवेत घेतले. या प्रकारावरून महापालिका परिवहन समिती सभेत जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे सदस्य शिवाजी मग्रुमखाने आणि भाजपचे सदस्य शंकर बंडगर हे एकमेकांना भिडले. वाद वाढत असल्याने सभापती राजन जाधव यांनी सभा तहकूब केली. सलग पाचवी सभाही तहकूब करण्याची नामुष्की सभापतींवर आली.

मंगळवारी सभा सुरू होताच बंडगर यांनी याप्रकरणी लक्षवेधी उपस्थित केली. पाच रुपये गैरव्यवहार करणाऱ्या महिला वाहक बिराजदार यांच्याकडून किरकोळ चूक झाली. त्यांना कामावर घेण्यासाठी वारंवार विनंती केली असता, घेतले नाही. उलट दीड हजार रुपयांच्या गैरव्यवहार केल्याप्रकरणी जितेंद्र मोरे यांना पुन्हा कामावर घेतले.

ही बाब गंभीर असल्याचे निदर्शनास आणून बंडगर कोणाची शिफारस होती? अशी विचारणा केली. त्यावर व्यवस्थापक श्रीकांत मायकलवार यांनी मग्रमुखाने यांचे नाव सांगितले. त्यानंतर वाद झाला.

सुमारे अर्धातास मग्रुमखाने आणि बंडगर यांनी गोंधळ घातला. शेवटी सभापती जाधव यांनी सभा तहकूब करत असल्याचे सांगत उठून गेले. त्यानंतर वाद शमला.

महिलेवर अन्याय
पाचरुपयेअनावधानाने चूक झाल्याने महिलेस निलंबित केले. पण दीड हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्यांस कामावर घेतले. त्यामुळे लक्षवेधी घेतली. महिलेवर अन्याय होत आहे.''
शंकर बंडगर, परिवहन समिती सदस्य

वाद झाल्याने तहकूब
^सभेतमग्रुमखानेआणि बंडगर यांच्यात वाद झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. परिवहन व्यवस्थापक देण्याची मागणी केली पण त्यावर महापालिका आयुक्त निर्णय घेत नाहीत. ''
राजन जाधव, मनपा परिवहन समिती सभापती

काहीही होऊ शकतं
महापालिकेत काहीही होऊ शकतं हे नाकारून चालत नाही. यापूर्वी मंडई विभागात २५ पैशासाठी एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले होते. आता पाच रुपयांसाठी एका महिलेस निलंबित केले.

पाचवेळा सभा तहकूब
भंगार विक्रीसह अनेक विषय प्रलंबित असताना समिती सभा सलग पाचवेळा तहकूब करण्यात आली. भाजप सदस्यांचा बहिष्कार, अंगावर धावून जाणे, फाईल फेकणे आदी कारणे आहेत.
परिवहन विभागात गोंधळाची स्थिती असून, परिवहन व्यवस्थापक मायकलवार वेळ देत नसल्याने नवीन व्यवस्थापक नेमा अशी मागणी सभापती राजेंद्र जाधव यांनी केली. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. यावर सभापती जाधव यांनी नाराजी व्यक्त केली
बातम्या आणखी आहेत...