आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मटण खायची इच्छा झाल्याने केली चोरी; गुन्हे शाखेने 5 चोरांना पकडले, 4 घटनांची उकल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवेढा रोडवरील एका ढाब्यावर चांगल्या पद्धतीचे मटण खाण्याची इच्छा झाल्यामुळे त्याने चक्क मंगळसूत्र हिसकावले. यासाठी मित्राची मदत घेतली अन् अाता पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तपासात ही बाब समोर अाली अाहे. गुन्हे शाखेने जबरी चोरी प्रकरणी तिघांना तर मंगळसूत्र हिसकावल्याप्रकरणी दोघांना जेरबंद केले अाहे. मटण खाणे, चांगले कपडे, महागडे वस्तू घेण्याची हौस होती, चैनीसाठी पैसे लागत होते. 
 
गणेश शंकर कांबळे (वय २०, रा. दमाणीनगर, शिवानंद मठाशेजारी) सुनील राजकुमार हुणचिकट्टी (वय १९, रा. दमाणीनगर, विमा हाॅस्पिटलजवळ) यांना अटक झाली अाहे. दोघे सहा सप्टेंबर २०१७ रोजी डफरीन चौकातील बडोदा बँकेच्या बोळात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले होते. पत्ता विचारण्याचा बहाणा करून हा प्रकार केला होता. सदर बझार पोलिसात तक्रार दाखल अाहे. दोन तोळे गंठण जप्त अाहे. 
 
जबरी चोरी प्रकरणी तिघेजण अटकेत 
रूपाभवानी मंदिराजवळ, जुना तुळजापूर नाका उड्डाणपूलाजवळ तर शेळगी क्राॅसरस्ता येथे जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यात तिघांना अटक झाली अाहे. सूरज किरण बनसोडे (१८, रा. देशमुख पाटीलवस्ती, अांबराई), नागनाथ रतन दंदाडे (वय २१, अौसेवस्ती, अामराई), कृष्णा महादेव खानापुरे (२१, रा. शेटेवस्ती) अशी त्यांची नावे अाहेत. तिघे पाळत ठेवून जबरी चोरी करायचे. कमी गर्दीची ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, व्यापारी यांच्यावर पाळत ठेवत. पत्ता विचारण्याचा बहाणा अथवा दुचाकीवरून जाताना मुद्दाम त्यांना धक्का मारून भांडण करून पैसे दागिने पळविण्याची पद्धत अाहे. 
 
या गुन्ह्यांची दिली कबुली 
अशोक नागणसुरे यांचे पन्नास हजार रुपये पळविले होते, शरयू पुजारी यांची सोनसाखळी हिसकावली, रवींद्र कांगारे यांचे दोन तोळ्याची चेन गेली होती. ते दागिने जप्त केले अाहेत. तीन दुचाकी जप्त अाहेत. 
 
चैनीसाठी करत होते गुन्हे 
चांगल्या हाॅटेलात जेवणे, कपडे, मोबाइल घेण्याचा मोह तरुणांना होता. सगळेजण विशीतील अाहेत. काहीच काम अथवा शिक्षण घेत नाहीत. पाच जणांपैकी चौघांनी पहिल्यांदा गुन्हा केला अाहे. एकजण रेकाॅर्डवरचा असल्याची माहिती पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांनी दिली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...