आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० कोटी उलाढालीस असेल ‘एलबीटी’ लागू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आॅगस्टपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची अधिसूचना गुरुवारी राज्य सरकारने जारी केली. मात्र, यात एलबीटी आॅगस्टपासून बंद असे थेट सांगितलेले नाही. ५० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना ‘एलबीटी’ लागू राहणार आहे. त्यानुसार शहरातील सुमारे १० ते १२ व्यापाऱ्यांना एलबीटी लागू राहील. इंधनाच्या बाबतीत ५० कोटींची नियमावली लागू झाल्यास शहरातील पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार नाहीत.
व्यापाऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन चेंबर आॅफ काॅमर्सने केले आहे. अभय योजनेत व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी महापालिका एलबीटी विभागात व्यापाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली.

व्यापारी संघटनेचे प्रभाकर वनकुद्रे, राजू राठी आदी व्यापारी उपस्थित होते. अभय योजनेचे ५५० फार्म व्यापाऱ्यांनी जमा केले याशिवाय ७१.७५ लाखांचा धनादेश िदला.

मनपाकार्यालय खुले
२५जुलै रोजी चौथा शनिवार, २६ जुलै रोजी रविवार तर २७ जुलै रोजी अाषाढी एकादशी असल्याने शासकीय कार्यालय सलग तीन दिवस सुट्टी राहणार आहे. या तीन दिवस सुटीच्या दिवशी मनपात एलबीटी विभाग सुरू राहणार असून, व्यापाऱ्यांना विवरणपत्र, अभय योजना फार्म, एलबीटी रक्कम भरता येणार आहे.