आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० कॉटचे रुग्णालय, घरासाठी लाख : श्रममंत्र्यांनी केली घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कुंभारीपरिसरातील विडी कामगारांच्या वसाहतीसाठी ५० कॉटचे सुसज्ज रुग्णालय देण्याची घोषणा केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी मंगळवारी येथे केली. घरकुलचे अनुदान ४० हजार रुपयांवरून लाख रुपये केल्याची माहिती त्यांनी दिली. कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील १६०० घरांचा हस्तांतरण सोहळा मंगळवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते.
श्री. दत्तात्रय हे सिकंदराबादचे. त्यांनी सुरुवातीला तेलुगुतून भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर हिंदीतून बाेलले. मी कामगारांना एक चांगली वार्ता देण्यासाठी आलोय असे म्हणत त्यांनी घरकुल अनुदानातील वाढीची घोषणा केली. टाळ्या वाजवून कामगारांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

श्री. दत्तात्रय म्हणाले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून उद्योग आणि रोजगार वाढीसंदर्भातले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याची घोषणा झाली. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कायदा केला. दरमहा हजार रुपये वेतन, भविष्य िनर्वाह निधी आदी देण्याची सूचना केली. कामगार पाल्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ केली.”

मुख्यमंत्रीकार्यालयावर सोलापूरचे आहे वर्चस्व
मुख्यमंत्र्यांचेसचिव प्रवीणसिंह परदेशी सोलापूरचे. नगरविकास खात्याचे सचिव मिलिंद म्हैसकर सोलापूरचे. मुख्यमंत्री कार्यालयावर सोलापूरचे वर्चस्व आहे. त्यामुळे सोलापूरकरांची कामे थांबणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणताच टाळ्या पडल्या.

प्रशासनविरोधात तक्रार
संस्थेचेमुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी जिल्हा प्रशासनाच्या अडवणुकीविषयी मुख्यमंत्र्यांसमोर थेट कैफियत मांडली. कार्यक्रमाचे नियोजन तोंडावर आल्यानंतर अकृषिक सारा भरण्याविषयी तगादा लावला. ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता ते ‘किरकोळ आहे’ असे सहज बोलले. मोजणी शुल्कची घरटी १५०० रुपयांची मागणी केली. ही रक्कम गरीब कुटुंबे आणणार कुठून? असा प्रश्न केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यभर करमुक्त घर देण्याची घोषणा केली.

शहर विकासाला गती मिळाली
सोलापूरचास्मार्ट सिटीत समावेश झाला. शहरात उड्डाणपूल मंजूर झाले. अद्ययावत बसपोर्टलला मंजुरी मिळाली. त्याने सोलापूर शहराच्या विकासाला गती मिळाली. सध्या यंत्रमाग, विडी उद्योग संकटात आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनावर तात्पुरता तोडगा काढला. विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री

जगातीलमोठी कामगार वसाहत
गोदूताईपरुळेकरांच्या नावाने १० हजार घरकुलांची उभारणी झाल्यानंतर त्याची नोंद आशिया खंडातील सर्वात मोठ्या कामगार गृहप्रकल्पात झाली. कुंभारी परिसरात आणखी ३० हजार घरे झाली तर जगातील सर्वात मोठी कामगार वसाहत होईल. येथील कामगारांना पर्यायी रोजगार देण्याचे प्रयत्न व्हावेत अॅड.शरद बनसोडे, खासदार

घोषणांपेक्षाअंमल करणे महत्त्वाचे
केंद्रअाणि राज्य शासनाने कामगारांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. परंतु त्या घोषणांचे फलित अंमलबजावणीतून दिसून येणे आवश्यक असते. नुसत्या योजना देऊन भागणार नाही. त्याच्या प्रभावी अंमलासाठी यंत्रणा सक्षम करावी. त्याकडे राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. तपनसेन, खासदार (पश्चिम बंगाल)

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शमीम जमादार, नागमणी जारेटला, अरुणा फलमारी, अनुराधा कल्लेपल्ली, यमुना सामल या पाच महिलांच्या हाती प्रतिकात्मक चाव्या देण्यात आल्या. त्याने या महिला अतिशय आनंदित झाल्या. यावेळी केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुभाष देशमुख आदी.