आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालय अनुदान योजनेत पन्नास लाखांचा गैरव्यवहार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - केंद्रशासनाच्या शौचालय अनुदान योजनेतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी मुंबईहून अालेले पथक गेल्या सहा दिवसांपासून सोलापुरात ठाण मांडून अाहे. या पथकाच्या चौकशीत सुमारे ३४५ कुटुंबांनी शौचालय अनुदान उचलले पण शौचालय बांधले नाही तर ५१७ लाभार्थींनी पहिल्या टप्प्यातील अडीच हजार रुपये उचलून वर्षाचा कालावधी लोटला तरी बांधकाम करता गैरप्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर अाले. ही गैरप्रकाराची रक्कम सुमारे ५० लाखांच्या अासपास होऊ शकते.

केंद्र शासनाकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील १४ हजार ४६६ शौचालय अनुदान
लाभार्थींसाठी प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे १३.०१ कोटी अनुदान महापालिकेस उपलब्ध झाले होते. पालिकेने १०,९३२ पात्र लाभार्थींना शौचालयासाठी अनुदान वितरीत केले. शासनाच्या निधीचा योग्य विनियोग झाला काय? याच्या तपासणीसाठी शासनाचे पथक सोलापुरात अाले. पथकास ३४५ शौचालये अाढळून अाली नाहीत. ५१७ लाभार्थींना अडीच हजार रुपये अनुदान दिले, पण पण बांधकाम झाले नसल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले. याशिवाय मक्तेदार पालिकेकडून २६८ जणांनी एकाच योजनेसाठी दोनदा अनुदान लाटल्याचे उघड झाले.
शहरातील शौचालयाची तपासणी आणि पाहणी केली. काही शौचालयाचे अनुदान घेतले पण बांधले नाही. या सर्व बाबींचा तपशीलासह अहवाल स्वच्छता विभागाचे सचिव राजेशकुमार मीना यांच्याकडे देऊ. - आनंद परदेशी, उपसचिव,राज्य शासन स्वच्छता विभाग

हा तर गैरव्यवहारच
शौचालयात प्राथमिक चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. चौकशीचा अहवाल शासनाला देणार आहे. शासन आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. -श्रीकांत म्याकलवार, उपायुक्त,मनपा

अशी होती योजना
>शौचालयाचेउद्दिष्ट- १४ हजार ४६६
>वैयक्तिक लाभार्थीमार्फत बांधलेले - ४८७६
>मक्तेदारांमार्फतबांधलेले- ६१४६
>बांधलेले शौचालय- १० हजार ९३२
>बांधले नाहीत- ३५३४
>प्राप्त अनुदान- १३.०१ काेटी
>शिल्लकअनुदान- ३.९७ कोटी
>अडीच हजार पहिल्या टप्प्यातील अनुदान घेतले ५१७ लाभार्थी - १२.९२ लाख
>३४५ शौचालयांचे अनुदान घेतले पण बांधले नाही - ३१.०५ लाख
>भारत कन्स्ट्रक्शनचे भारत मन्सावाले यांच्यावर गुन्हा.

पथकासमोर प्रश्न
>अनुदान वितरणापूर्वी आरोग्य निरीक्षकांनी शौचालयाची पाहणी केली नव्हती का?
>मक्तेदारास बिले देताना तपासणी केली का?
>शौचालय याेजनेतील कागदपत्रे पोलिसांना दिली, पण मनपाकडे कशी नाहीत?