आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात १०३८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी, प्रशासनाचा अंतिम अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील दुष्काळाचा लाभ मिळण्यासाठी महत्त्वाचा निकष ठरणारी अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जाहीर केली. नजरअंदाज, सुधारित अंतिम पैसेवारी यामध्ये जिल्हा प्रशासनाने बदल केला आहे. अंतिम पैसेवारीमध्ये जिल्ह्यातील १०६ गावे वगळण्यात आली असून, हजार ३८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक असल्याचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. अंतिम पैसेवारी अहवालानुसार महसूलमंत्री एकनाथ खडसे कोणता निर्णय घेणार? याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्ये नजरअंदाज, ३१ जानेवारी रोजी सुधारित तर १५ मार्च रोजी अंतिम पैसेवारीचा अहवाल सादर केला आहे. नजरअंदाज अहवालामध्ये जिल्ह्यात ६४५, सुधारित अहवालामध्ये ९४५ तर अंतिम पैसेवारीमध्ये हजार ३८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे दाखवले आहे. अंतिम अहवालानुसार आता फक्त १०६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. १० मार्च रोजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील ६४५ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली होती, यावर जिल्ह्यातील सर्वच लोक प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करीत सर्वच गावांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर करावी, अशी मागणी केली होती.

५० पेक्षा अधिक पैसेवारीची गावे...
उत्तर सोलापूर ८, दक्षिण सोलापूर १६, अक्कलकोट १३, माढा ५, करमाळा ३०, माळशिरस ३४ या सहा तालुक्यातील १०६ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक अाहे. बार्शी, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा सांगोला या तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखवली आहे.
पुढे वाचा .... तालुकानिहाय गावांची संख्या...
बातम्या आणखी आहेत...