आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीवरून महापालिका सभागृहात भाजप एकाकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नाेटाबंदीवरून महापालिका सभागृहात सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आमने-सामने आले. अर्धा तास गोंधळ सुरू होता. भाजप एकाकी पडल्याचे दिसून आले. शिवसेना, बसप, रिपाइं नगरसेवक तटस्थ होते. गोंधळ पाहता महापौर सुशीला आबुटे यांनी दिवसभरासाठी सभा तहकूब केली.
नोव्हेंबरची सभा शनिवारी झाली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी नियोजन करून नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन केले. सभेपूर्वी महापौर कार्यालयासमोर एकत्र आले. सभा सुरू होताच सर्व नगरसेवक मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत फलक घेऊन सभागृहात प्रवेश केला. नोटाबंदीच्या विरोधातील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा निषेधाचे फलक हाती होते. हे पाहून भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यास प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हौद्यात येऊन काँग्रेसविरुद्ध घोषणाबाजी केली.

स्वकीयांची मदत नाही
अंबानी,अदानी यांना कर्ज माफ करणाऱ्यांचा धिक्कार असो, आईला रांगेत उभे करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो आदी फलक घेऊन आघाडीचे नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.

गली,गली मे कौन है काँग्रेसवाले चोर है, इस देश के गद्दारो को..... आदी घोषणा भाजपच्या नगरसेवकांनी दिल्या. काँग्रेसचे नगरसेवक बसले तरी भाजपच्या नगरसेवकांची घोषणाबाजी सुरूच होती. ते एकाकी पडले. त्यांना महायुतीतील अन्य पक्षांचे नगरसेवक मदतीस आले नाहीत. रिपाइं, शिवसेनेचे नगरसेवक मात्र तटस्थपणे सभागृहात उभे होते. बसपचे नगरसेवक तटस्थ होते. त्यांनी या विषयावर चर्चेची मागणी केली.

जनतेच्या भावना मांडल्या
नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. त्यांच्या भावना आम्ही सभागृहात मांडल्या. रस्त्यावर आंदोलन केले की भावना कळतात असे नाही. सभागृहातही भावना मांडता येते. म्हणून आम्ही नोटाबंदीच्या विरोधात घोषणाबाजी केली.” - संजय हेमगड्डी, मनपा सभागृह नेते

रस्त्यावरचे आंदोलन सभागृहात का?
महापालिका सभागृह विकासकामांसाठी आहे. आंदोलनासाठी नाही. देशातील आंदोलन मनपा सभागृहात का? रस्त्यावर जाऊन आंदोलन करावे आणि सभागृहात शहराच्या विकासासाठी चर्चा करावी, ही भूमिका घेऊन तटस्थ होतो.” - आनंद चंदनशिवे, बसप माकप गटनेता

आम्ही भावना कळवल्या
नोटाबंदीच्या विरोधात शिवसेनेेने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आम्ही सभागृहात भाजपसोबत जाण्यापेक्षा तटस्थ राहिलो. शिवसेना शहराच्या विकासासाठी बांधील आहे.” - शैलेंद्र आमणगी, नगरसेवक
सभागृहात आंदोलन कशासाठी?
^केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात महापालिका सभागृहात आंदोलन करून काय उपयोग? रस्त्यावर जाऊन करावे. सभागृहात विकासकामांबाबत चर्चा करायची आहे. आमच्या विरोधात घोषणा दिल्याने आम्हीही त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.” नरेंद्रकाळे, मनपा विरोधी पक्षनेता
काँग्रेस- राष्ट्रवादी भाजपची जुंपली, सभा तहकूब
बातम्या आणखी आहेत...