आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भया निधीतून रेल्वेला ५०० कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने काही ठरावीक रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. आता देशभरातील सुमारे १००० हजार रेल्वे स्थानकावर सुमारे ३५ हजार सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. यासाठी केंद्राच्या निर्भया निधीतून रेल्वेस सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. बसवण्यात येणारे कॅमेरे हे अत्याधुनिक तर असतील शिवाय यावर थेट रेल्वे अधिकाऱ्याचे लक्ष राहणार आहे. ज्या स्थानकावर कॅमेरे बसवले जातील ते संबधित डीआरएम कार्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची नजर स्थानकावरील घटनेवर राहण्यास मदत होणार आहे.
२०१७ च्या अखेरपर्यत १ हजार स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उद्देश आहे. देशातील ए वन दर्जाच्या स्थानकापासून ते सी दर्जाच्या स्थानकापर्यत सीसीटीव्ही बसवले जातील. प्रत्येक स्थानकावर अंदाजे ३५ सीसीटीव्ही बसविले जातील. तसेच याची लिंक डीआरएम कार्यालयातील िनयंत्रण कक्षाशी जोडलेली असणार आहे. सध्या सोलापूर स्थानकावर ३९ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. नवीन कॅमेरे बसवल्यानंतर कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा मजबूत होण्यास मदत मिळेल.
रेल्वे कर्मचाऱ्यांवरदेखील राहणार नजर : रेल्वे स्थानकावर बसविण्यात येणारे नवे सीसीटीव्हीसाठी आयपी बेस टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे. यामुळे स्थानकावरील स्वच्छतेपासून ते कर्मचाऱ्यांपर्यत रेल्वे प्रशासनाची नजर राहणार अाहे, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानक सुरक्षेसाठी महत्त्वाची बाब
निर्भया निधीच्या माध्यमातून देशातील महत्त्वाच्या स्थानकावर सीसीटीव्ही बसविले जातील. यासाठी आयपी बसे टेक्नाॅलॉजीचा उपयोग केला जाईल. त्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्थानकावर काय चालले हे समजेल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही महत्त्वाची बाब आहे.
मनिंदर सिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक. सोलापूर
बातम्या आणखी आहेत...