आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्‍ये 5 हजार विद्यार्थी ‘आधारकार्ड’विना, जिल्ह्यामध्ये आधार केंद्राची वाणवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शासनाने आधार सक्ती सर्वत्र केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील हजार ३७३ शाळांमधील लाख हजार ७६४ विद्यार्थ्यांकडे ‘आधारकार्ड’ आहे. तर जवळपास हजार ८६० विद्यार्थी अद्यापही आधारकार्ड विनाच आहे. आधारकार्ड काढण्यासाठी बोटावर मोजण्याईतकेच केंद्र आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डसाठी विशेष केंद्र सुरू करावे, अशी मागणी सुरू आहे. 
 
शाळेतील नर्सरी पासून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आधारसक्ती करण्यात आली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे अद्यापही आधारकार्ड नाही. अशा परिस्थितीत आधार बनविण्यासाठी केंद्रावर धाव घेतल्या जात आहे. मात्र, बोटावर मोजण्याईतकेच केंद्र सुरू असल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीत हजार ३७३ शाळा आहे. यामध्ये लाख ५४ हजार ६०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्या अनुषंगाने ह्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड जमा करावे, अशा सुचना जारी केल्या होत्या. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून ते आजतागत जिल्ह्यातील लाख ४४ हजार ७६४ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शाळेत जमा करण्यात आले आहे. तर हजार ९८२ विद्यार्थ्यांनी ईआयडी पावती शाळेत जमा केली आहे. 

अशा विद्यार्थ्यांचे लवकरच आधारकार्ड येईल. असे असलेतरी अद्यापही हजार ८६० विद्यार्थ्यांचे आधारकार्ड झालेच नाही. जिल्ह्यात आधार केंद्र बोटावर मोजण्याईतकेच सुरू आहेत. भरीस भर दैनंदिन केवळ ५० अर्ज दिल्या जात असल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विशेष पावले उचलून आधार कार्ड बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालकवर्गांकडून केल्या जात आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र काही कारणास्तव बंद करण्यात आले होते. अशा परिस्थितीत पालकांची मोठी पंचाईत झाली होती. आता सध्या ह्या केंद्रावरून आधारकार्ड बनविणे सुरू असल्याची माहिती आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...