आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

519 किलो प्लास्टिक कॅरिबॅग जप्त, पोलिस पथकाने केली पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनाई असलेल्या ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापराविरुद्ध महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. छापा टाकून तीन व्यापाऱ्यांकडे ५१९ किलो कॅरिबॅग जप्त केल्या. एकूण १.३१ लाखांचा ऐवज महापालिकेने जप्त केला. 
 
प्लास्टिक विक्री करण्यासाठी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. तपासण्यासाठी एस. के. आराध्ये, नागरी विचार मंचचे डाॅ. राजा ढेपे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे के. डी. गोरे, भुई, मनपा अन्न परवाना निरीक्षक एम. डी. शेरखाने यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तपासणी केली. 
 
त्यात ५१९ किलो कॅरिबॅग त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत ३६ हजार रुपये इतकी होते. यासह इतर सुमारे १.३१ लाखाचा ऐवज जप्त केला. यात संतोष सारडा यांच्याकडून २९१ किलो तर राकेश वाधवानी यांच्याकडून ११७, भिकचंद राठी यांच्याकडून १११ किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिका अन्य परवाना विभागाकडून देण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...