आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५४ मीटर बाह्यवळणाचे काम सुरू, वाहतुक कोंडी टळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जुनापुणे नाका ते विजापूर रस्तालगतच्या एसआरपी कॅम्पपर्यंत ८.५ किमी लांबीचा, ५४ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. गेले आठ दिवस जागेवर रेखांकनाचे (मार्किंग) काम सुरू आहे. यासाठी जेसीबीने चर खोदण्यात येत आहे.

रस्ता झाल्यास त्या परिसरातील १० हजार एकर जमिनी विकासाखाली येणार आहे. त्यामुळे महापालिकेस ५०० ते ७०० कोटी विकास शुल्क जमा होणार आहे असा अंदाज आहे. मुख्य म्हणजे शिवाजी चौक ते सात रस्ता मार्गावर वाहतुकीचा ताण कमी होऊन कोंडी टळणार आहे.

रेखांकनाचेकाम सुरू
५४मीटरच्या ८.५ किमी रस्त्यापैकी तीन किमी पर्यंत महापालिकेने आतापर्यंत रेखांकन केले आहे. एक जेसीबी, सहा कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत.

किमान१० टक्के तयार हवेत
महापालिकेने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. ८५ टक्के शेतकरी राजी आहेत. तसे हमी पत्र त्यांनी दिले आहे. किमान १० टक्के राजी असण्याची गरज असते. त्याबदल्यात त्यांना जागेवर टीडीआर देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. वन विभागाची पाच टक्के जमीन आहे. त्यासाठी महापालिका प्रस्ताव सादर करणार आहे.
मार्किंगसाठी अशी चर खोदली आहे.
खर्च ३० कोटी : एकरेल्वे पूलासह ३० कोटींची निधी आवश्यक आहे. त्यासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करता येईल.

बुधवारी पाहणी
रस्ताव्हावा यासाठी महापालिका, नगरसेवक मनोहर सपाटे, बांधकाम व्यावसायिक यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी महापालिकेचे अधिकारी रामचंद्र पेंटर, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील फुरडे, प्रदीप पिंपरकर, संदेश देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

परिसरातसुधारणा होतील
रस्ताकेल्यास परिसरात सुधारणा होईल. महापालिकेस विकास शुल्कापोटी रक्कम मिळेल. रस्ता करण्यास कोणाचाही अडथळा नाही, त्यामुळे तत्काळ महापालिकेने रस्त्याचे काम सुरू करावे.” मनोहरसपाटे, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...