आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी सांगितले होते सतर्क राहा चोरी होईल, चोरट्यांनी मारला 7 लाखांवर डल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथील पद्मनगर परिसरात चोरट्यांनी एका घरात घुसून 25 तोळे सोने आणि 21 हजारांची रोख रक्कम असा 7 लाखांहून अधिकचे मुद्देमाल घेऊन पळ काढला. नागनाथ नारायण जक्का यांच्यात घरात झालेल्या या चोरीची माहिती मंगळवारी सकाळी उघड झाली आहे. यानंतर पोलिसांना बोलावून तक्रार नोंदवण्यात आली आहे. 
 

चोरी करताना खात होते चोरटे
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, चोरटे सोमवारी रात्री उशीरानंतर जक्का यांच्या घरात घुसले. ज्या खोलीत तिजोरी ठेवली होती, त्याचे दार कमकुवत होते. तसेच त्या ठिकाणी कुणीही झोपलेले नाही असे चोरांच्या निदर्शनास आले. याचवेळी चोरट्यांनी माल लुटताना घरातील सुका मेवा पस्त केला. अगदी खात-खात चोरट्यांनी ही चोरी केली असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. 
 

15 दिवसांपूर्वीच केले सतर्क
जक्का यांच्या घरात चोरी होण्याच्या 15 दिवसांपूर्वी याच परिसरात एक चोरीची घटना घडली होती. तेव्हा एका चोरट्याची चप्पल पोलिसांना जक्का यांच्या अंगनात सापडली होती. त्याचवेळी पोलिसांना जक्का कुटुंबियांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या घरातील अंगणात एकही लाईट नाही. परिसरात पथदिवे सुद्धा नसल्याने रात्री काळोख पसरतो. अशात चोरट्यांना चोरून पळ काढणे सोपे होत आहे. दरम्यान चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...