आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात द्राक्ष बागेत औषध फवारणी करणाऱ्या 7 मजुरांना विषबाधा, 4 जण अत्यवस्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
सोलापूर- बार्शी तालुक्यात द्राक्ष बागेतील काड्यांना औषध लावल्यानंतर 7 मजुरांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील 4 मजूर बेशुद्ध असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.
 
हिंगणी पा येथील शेतकरी आनंद काशीद यांची 19 एकर द्राक्षबाग आहे. ऑक्टोबर छाटणी नंतर द्राक्ष काडी फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाईत हे औषध शेतकरी छाटलेल्या काड्यांना लावतात. काशीद यांनी वैराग येथील औषध विक्रेते सोनार महाराज यांच्याकडून कॅनब्रेक कंपनीचे औषध खरेदी केले होते. हे औषध रंगात मिसळून कापडाच्या साह्याने हाताने द्राक्ष काड्याना लावण्यात येत होते. काशीद यांच्या शेतात शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत औषध लावण्याचे काम चिखर्डे येथील 11 तरुण शेतकरी कारी येथील ठेकेदार संभाजी घावटे यांच्या मार्फत करत होते. दिवसभर औषध लावताना शेतकऱ्यांचे अंगावर हे औषध उतरल्याने त्वचेतून विषबाधा झाली. काम संपल्या नंतर रात्री उशिरा या कामगारांना त्रास जाणवु लागल्याने बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल व कोंढारे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. आनंद नानासाहेब माने (वय 22), तानाजी मोहन देठे (वय 23), किरण मधुकर म्हसेकर (वय 23), दत्तात्रय तुळशीदास चव्हाण (वय 27), अक्षय हनुमंत सवणे (वय 18), सागर जनार्धन सुतार (वय 21), बाबू बापू ढवारे (वय 40) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...