आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टिळा होळीतून वाचवणार ७० हजार लिटर पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाढते पाण्याचे दुर्भिक्ष पाहता ‘दिव्य मराठी’ने केलेल्या टिळा होळी या उपक्रमास प्रतिसाद देत लोधी समाजाने सामाजिक जाणीवेचे भान राखत यंदा फुलांच्या पाकळ्या उडवून कोरड्या रंगाचा कपाळास टिळा लावत होळीचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून तब्बल ७० हजार लिटर पाणीबचत साध्य होणार आहे.

प्रतिवर्षी लोधी समाज मोठ्या दिमाखात ३५ ते ४० बैलगाड्या तीन ट्रॅक्टरसह रंगपंचमीत मिरवणूक काढतो. पाण्याचा मोठा वापर होतो. २०१३ पासून ‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत लोधी समाज कोरडे रंग खेळत पाण्याची बचत करत आहे. यंदाही वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक निघणार आहे. परंतु यावेळी केवळ फुलांच्या पाकळ्या कोरड्या रंगाची टिळा होळी साजरी होत आहे.

लाेधी समाजाचा निर्णय
सुमारे४० बैलगाड्या, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह मिरवणूक निघते. एका गाडीत दोन पिंप असतात. २०० लिटर प्रत्येकी असे सुमारे १० हजार लिटर पाणी होते. शिवाय दोनदा टँकरने पाणी भरले जाते. यातून १५ हजार लिटर असे एकूण २५ हजार लिटर पाणी यंदा वाचणार आहे. शिवाय रस्त्यावर समाजबांधवांकडून होणारी पाण्याची बरसात आंघोळ यातूनही १५ हजार लिटर पाणी वाचेल.

राजपूत समाजात चर्चा
प्रतिवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी राजपूत समाजाच्या रंगगाड्यांची जोरात वाजतगाजत रंगपंचमी मिरवणूक निघते. चौपाड बालाजी मंदिर येथून सुरुवात होते. मागील तीन वर्षांपासून पाण्याचा अपव्यय टाळत आहेत. केवळ एक हंडाभर रंगाची पूजा होत कोरडे रंग कपाळावर लावण्यात येते.

राजपूत समाज : मिरवणुकीत एरवी २०० लिटरचे १० पिंप असतात. पाच ते सहावेळा पुन्हा भरले जातात. एकूण १० ते १२ हजार लिटर पाणी वापरले जाते. मिरवणुकीवर विविध ठिकाणी इमारतींवरून पाणी टाकले जाते. यात सुमारे हजार लिटर पाण्याचा वापर होतो. रंग खेळून झाल्यानंतर अंघोळीसाठी हजार लिटर पाणी लागते. कोरडी रंगपंचमी साजरी होणार असल्याने सुमारे २२ हजार लिटर पाणी वाचेल.
लोधी समाजाच्या रंगगाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी असते. पाण्याच्या कमतरतेमुळे यंदाही रंगपंचमीत पाणी वाचवणार आहोत. २०१३ मध्येही ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमास साथ देत पाणीबचत केली होती. सर्वांनीच याचे पालन करीत सामाजिक भान ठेवावे. मागील २५० वर्षांत विनारंगाच्या गाड्या काढण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेत आम्ही समाजमन जपले आहे.” माणिकसिंगमैनावाले, अध्यक्ष,लोधी समाज ट्रस्टी
बातम्या आणखी आहेत...