आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचडीएफसीला 75 लाखांचा गंडा 7 जणांविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नोकरीला असल्याचे सांगून त्याबाबतची बनावट कागदपत्रे, पगारपत्रक तसेच इतर कागदांची जुळवाजुळव करून एचडीएफसी बँकेच्या उस्मानाबाद शाखेतून २४ लाख ३५,९४३ रुपयांचे वैयक्तिक कर्ज उचलणाऱ्या जणांविरुद्ध आनंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी बँकेचे उपसरव्यवस्थापक श्रीराम हिरेमठ (सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी दादासाहेब शिंदे (रा. पिरळे, ता. माळशिरस), अनिल कांदे (रा. बोरगाव खुर्द, ता. बार्शी), सोमनाथ शिंदे (रा. पिरळे), जयहरी देशमुख (रा. देवळाली, ता. उस्मानाबाद. हल्ली चौघेही रा. उस्मानाबाद) तसेच खंडोजी काळे (रा. राळेरास, ता. बार्शी), अनिल अडसुळे (मारवाडी गल्ली, उस्मानाबाद), याेगेश भोसले (विकासनगर, उस्मानाबाद) हे सर्वजण शाळेत नोकरीस असल्याचे सांगूनत्यांनी एचडीएफसी बँकेच्या उस्मानाबाद शाखेत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला. यावेळी सोबत बनावट कागदपत्र, पगारपत्रक, बँकेचे खोटे स्टेटमेंट जोडून ते खरे असल्याचे भासवून या सर्वांनी एकूण २४ लाख ३५ हजार ९४३ रुपयांचे वैयक्तिक कर्ज उचलले. हा प्रकार उजेडात अाल्यानंतर उपसरव्यवस्थापक हिरेमठ यांनी याप्रकरणी सोलापूर येथील फौजदार चावडी पोलिसांत तक्रार दिली. परंतु, प्रकरण उस्मानाबाद येथील असल्याने तेथे शून्यने
नोंद करून पुढील कारवाईसाठी उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष माने हे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...