आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दगडफेकप्रकरणी 8 जणांना पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होटगी रस्ता, अासरा चौकात रविवारी दुपारी १२-१५ जणांच्या टोळीने हाॅटेल, दुकानावर दगडफेक केली होती. या प्रकरणात सोमवारी अाठजणांना अटक करण्यात अाली अाहे. त्यांना न्यायाधीश शर्वरी अांबेडकर यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली.

योगेश पवार (लक्ष्मीपेठ), जयसिंग वडणे (डीसीसी बँक काॅलनी), अमोल चव्हाण (निर्मिती विहार), विश्वजित चुंगे (वडगाव, तुळजापूर), अोम वडणे, अक्षय जाधव, प्रदीप सावंत (रा. सर्वजण शिवाजी चौक), विकी पवार (रा. निराळेवस्ती ) अशी त्यांची नावे आहेत. फाैजदार दत्तात्रय लिगाडे यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली अाहे.

होटगी रस्त्यावरील गीता ट्रेडर्स, हाॅटेल खान चाचा, कॅफे सुलतान, सीटी क्राॅकरी फर्निचर दुकानावर दगडफेक केल्याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला अाहे. अाठजणांना अटक झाली असून, अन्य तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एन. जी. अंकुशकर यांनी दिली. दगडफेकीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अाहे.

व्हॉटस्अॅप अॅडमिन ही सहअारोपी
शनिवारी रात्री एका व्हाॅटस्अॅप ग्रुपवर अाक्षेपार्ह मजकूर टाकल्याने एका तरुणाला अटक झाली अाहे. ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरण्यात येते. अायटी अॅक्ट ६६-३ २९५ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्यास किमान वर्षे शिक्षा होऊ शकते अशी माहिती पीअाय अंकुशकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...