आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८२७ ड्रेस आढळले, विद्यार्थ्यांची नावे असतानाही वाटप का नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या पथकाकडून गणवेश असलेल्या पोत्याची सोमवारी तपासणी करण्यात आली. त्यावेळी ८२७ गणवेश आढळून आले. या सर्व गणवेशांना सील करण्यात आले आहे. गणवेशावर विद्यार्थ्यांची नावे असताना वाटप का झाले नाही. बोगस पटसंख्या इतर कारणांचा शोध घेण्यात येत आहे. मनपाच्या उदासीन भूमिकेमुळे सर्व शिक्षा अभियान प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या घटनेवरून दिसत आहे.

मनपा शाळा क्र. १९ मध्ये सोमवारी मनपा प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. पूर्वी दोन पोती गणवेश आहे असे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात सात पोती, दोन बॉक्समध्ये गणवेश आढळून आले. सात पैकी एका पोत्यात १६० गणवेश सापडले. त्या गणवेशांवर विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव लिहिण्यात आले आहे. पंचनाम्यात सापडलेले गणवेश अंदाजे सात वर्षांपूर्वीचे असतील, असा अंदाज लावण्यात आला आहे. यावरून मनपा शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ लक्षात येतो.

बनियन,टी शर्टही सापडले
पंचनाम्यातसापडलेले सर्व गणवेश साईजनुसार एकत्रित करण्यात आले आहेत. यामध्ये मुलांचे ४७७ तर, मुलींचे ३५० गणवेश आहेत. यामध्ये खाकी पॅण्ट, शर्ट, निळा-पांढरा ड्रेस, पंजाबी ड्रेस आदींचा समावेश आहे. खेळाडूंसाठी सोलापूर मनपा नावासह छापलेले ३७ बनियन तर २७ टी शर्ट आढळून आले आहेत.

गणवेश सील केले
पंचनाम्यात आढळून आलेल्या गणवेशाची गणती करून सील करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाचा सर्क्युलर ठराव करून घेऊन गरजूंना गणवेश वाटप करण्यात येईल. सुरुवातीला अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. विष्णूकांबळे, प्रशासनाधिकारी मनपा

पंचनामा पथक
मनपाप्रशासनाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तैनात करण्यात आलेल्या पंचनामा पथकामध्ये पर्यवेक्षक सुरेश कासार, शिवाजी शेटे तसेच कर्मचाऱ्यांमध्ये अरुण मैंदर्गीकर, गौस रिशालदार, प्राणेश त्रिमल, शाहबुद्दीन रचभरे आदींसह अंगणवाडी सेविकांचा समावेश होता.

माहितीच नाही
शिक्षणमंडळाकडे २०१३ पर्यंत गणवेश वाटपाविषयी माहिती नाही. त्यांनी किती शाळांना गणवेश वाटप केले, किती विद्यार्थ्यांनी लाभ घेतला, त्यांची संख्या किती, विद्यार्थ्यांना मिळाले की नाही, याची नोंदवहीत नोंदणीच केलेली नाही. २०१३ पासून या सर्व गोष्टींची नोंदणी करण्यात येत आहे.

काय आहे नियम
>शिक्षणहक्क कायदा येण्यापूर्वी मनपाच्या शाळांमध्ये वॉर्ड शालेय समितीच्या माध्यमातून गणवेश वाटप होत होते.
>एप्रिल २०१० पासून शालेय व्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या.
>त्यानुसार सर्व गणवेशाचे अधिकार संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहे.
>पटसंख्या, किती विद्यार्थ्यांना वाटप केले, गणवेश मिळाल्याची सही आदींची नोंदणी करणे गरजेचे आहे.
>जर शिल्लक राहिले असतील तर शिल्लक रकाण्यात माहिती घ्यावी लागते.

४०० रुपये अनुदान
सर्विशक्षा अभियानास २००४ पासून सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत प्राथमिक शाळेमधील अनुसूचित जाती, जमाती, बीपीएलधारक सर्व मुलींना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात. एका नगास २०० रुपयांप्रमाणे एका विद्यार्थ्यास ४०० रुपये दिले जातात. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश आवश्यक आहे.

विभागीय चौकशी करणार
विद्यार्थ्यांनागणवेश वाटप करता तसेच ठेवणे चुकीचे आहे. हे गणवेश ज्या कालावधीतील आहेत,त्या कालावधीतील मनपा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल. रामचंद्र जाधव, उपसंचालक, शिक्षण विभाग
बातम्या आणखी आहेत...