आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 85 Per Cent Voting In Grampanchayat In Solapur District

जिल्ह्यातील ४८७ ग्रामपंचायतींसाठी ८५ % मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर/बार्शी - जिल्ह्यातील४८७ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५.०४ टक्के मतदान झाले. बार्शी तालुक्यातील खडकोणी, अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे मतदानादरम्यान बाचाबाचीचे प्रकार घडले. उर्वरित जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. मंगळवारी मतमोजणी होणार आहे.
सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान झालेल्या तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी आहे. उत्तर सोलापूर : ८५.९४, दक्षिण सोलापूर : ८२.११, बार्शी : ८४.९१, अक्कलकोट : ८१.७२, मोहोळ : ८६.५५, पंढरपूर : ८८.६०, माढा : ८८.९२, करमाळा : ८६.२४, सांगोला : ८५.०४, मंगळवेढा : ८६.६०, माळशिरस : ७९.२४ टक्के.

जिल्ह्यातील एकूण ४८७ ग्रामपंचायींसाठी ४४९५ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील १० लाख ४१ हजार ३११ मतदारांपैकी लाख १८ हजार ३९३ महिला आणि लाख ६७ हजार २०४ पुरुष मतदारांनी ४४९५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले.
खडकोणीत यंत्र फोडले, १५ जणांविरुद्ध गुन्हा
तालुक्यातीलखडकोणी येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रावर दुपारी वा. दोन गटांत बाचाबाची झाली. यानंतर जमावाने मतदान यंत्र फोडले. या प्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

खडकोणी येथील प्रभाग क्रमांक तीनच्या मतदान केंद्राबाहेर एका महिलेस मतदान करताना एकाने सूचना केली. त्यावरून दोन गटांत बाचाबाची झाली. एका जमावाने मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान यंत्र फोडले. मतदान केंद्राध्यक्ष बाबू बेणे यांनी तत्काळ तहसीलदार बालाजी सूर्यवंशी यांना कळवले. घटनेचा पंचनामा करून पांगरी पोलिसांनी सुमारे १५ जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तत्काळ दुसरे मतदान यंत्र बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत केली.

यांच्यावरझाला गुन्हा नोंद : बाळासाहेब नलावडे, सोमनाथ नलावडे, योगेश नलावडे, रघुनाथ कोथमिरे, कालिदास आघाव, उमेश शिंदे, रामदास नलावडे, महेश नलावडे, गोकुळदास नलावडे, महादेव नलावडे, सचिन नलावडे, मारुती नलावडे, सतीश कोथमिरे, मनीषा गव्हाणे, अंकुश गव्हाणे.