आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाला प्रतिसाद देत नसल्याने शहरातील १५० गृहनिर्माण संस्था बरखास्त करण्यातील येतील, असा इशारा देण्यात आला. ज्या संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली, त्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन शहर उपनिबंधक कुंदन भाेळे यांनी केले आहे.
९७ व्या घटना दुरुस्तीनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका प्राधिकरणाकडे गेल्या. त्याच्या पुणे कार्यालयाकडे मतदार याद्या पाठवून, निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, आचारसंहिता लागू करणे, राबवणे या बाबी आल्या. त्यानुसार निवडणूक घेण्यास संस्था टाळाटाळ करत आहेत. काही संस्थांनी जुन्या पद्धतीनेच निवडणूक कार्यक्रम उरकून कारभार पुढे चालू ठेवला. ते बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फतच निवडणुका होणे आवश्यक आहे. अन्यथा संस्था बरखास्त करणे, अवसायनात काढणे, नोंदणी रद्द करणे अशी प्रक्रिया सुरू होईल, असा गंभीर इशारा श्री. भोळे यांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रियेतील संस्था
नागरी सहकारी पतसंस्था (७), हातमाग सहकारी संस्था (३५), सेवक सहकारी पतसंस्था (१४), औद्याेगिक सहकारी संस्था (८), ग्राहक सहकारी संस्था (९), यंत्रमाग सहकारी संस्था (३), स्वयंरोजगार सहकारी संस्था (१), इतर (१३) एकूण : ९०
बरखास्तीची प्रक्रिया सुरू केली आहे...
शहरातील १५० सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मतदारयादी सादर करणे, निवडणूक निधी जमा करणे या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम १०२ नुसार या संस्था अवसायानात काढून बरखास्तीची कारवाई केली जाईल. त्याची तयारी सुरू अाहे.
- कुंदन भोळे, शहर उपनिबंधक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.