आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 हजारच कर्जमाफी अर्ज ठरले पात्र; चाळणीतून 79 हजार अर्ज बाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जांतील माहिती बँकांमध्ये असलेल्या नोंदींशी जुळली नाही. त्यासाठी लावलेल्या चाळणी (याद्या तपासणी)तून तब्बल ७९ हजार ६९४ अर्जदार अपात्र ठरले. आता शेवटच्या टप्प्यात ४० हजार ६९३ अर्जदारांना योजनेचा लाभ मिळेल. अपात्र ठरलेल्यांना अपील करण्यासाठी लवकरच यंत्रणा स्थापन होण्याची शक्यता असल्याचे सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले. 


नोंद जुळत नसलेले एकूण १ लाख ४ हजार ५०३ अर्ज होते. त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अर्जांची तपासणी करण्यासाठी ६९ लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी अंतर्गत लेखापरीक्षकांकडून याद्या तपासून घेतल्या. त्या तालुकास्तरीय समितीकडे पाठवण्यात आल्या. या समितीने ७९ हजार ६९४ अर्ज पात्र असल्याचा निर्वाळा दिला. त्यानुसार या पात्र याद्या शासनाकडे पाठवल्या जातील. त्यांच्या रकमा लवकर बँकेतील खात्यावर जमा होतील, असेही श्री. देशमुख म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...