आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री जानकरांची तारीख मिळेना, पशुपालक पुरस्कार रखडले; अडीच महिन्यापासून तारीख पे तारीख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे वेळ देत नसल्याने जिल्हा परिषदेचे आदर्श पशुपालक पुरस्कारांचे वितरण गेल्या अडीच महिन्यांपासून रखडले आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाकडून 'तारीख पे तारीख'असा खेळ सुरू असल्याने पुरस्कार प्राप्त पशुपालकांमध्ये नाराजीचे चित्र आहे. 


जिल्हा परिषदेतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून (कै.) शंकरराव मोहिते आदर्श पशुपालक पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. विरोधी पक्षनेेते बळीराम साठे हे पशुसंवर्धन समितीचे सभापती असताना त्यांनी 'आदर्श गोपालक' पुरस्काराची संकल्पना सुरू केली होती. त्यासाठी झेडपी सेस फंडामध्ये विशिष्ट निधीची तरतूद करण्यात येते. 


फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मंत्री जानकर सोलापूरच्या दौऱ्यावर आले. नेहरूनगर येथील सधन कुक्कुट विकास गटाच्या केंद्राला भेट देऊन पाहणी केली होती. त्याच दौऱ्यास जोडून पुरस्कार वितरण होऊ शकले असते. पण, त्याबाबत प्रशासनाकडून ठोस हालचाली झाल्या नाहीत.


झेडपी पशुसंवर्धन विभागाची दप्तरदिरंगाई 
झेडपीच्या कृषी, महिला-बालकल्याण, शिक्षण, बांधकाम विभागतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण, पशुसंवर्धन विभागाच्या दप्तरदिरंगाईमुळे गेल्या दोन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण झाले नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत स्वत:च्या चुका झाकण्याचा खटाटोप पशुसंवर्धन विभागातर्फे सुरू आहे. कृषी, महिला-बालकल्याण, शिक्षण विभागांनी निवडणुकानंतर पुरस्कारांचे वितरण केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...