आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा तालुक्यात वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण, अधिकारी, कर्मचारी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यास सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. - Divya Marathi
गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यास सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

माढा (सोलापूर)- उपळाई बुद्रुक येथे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातुन उपळाई बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी गावातील उपकेंद्राला घेराव घालत तेथील प्रभारी उपकार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण व सहाय्यक अभियंता प्रेम चव्हाण या दोन अधिकारी व सहा कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

 

 

या घटनेत प्रेम चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आले आहे. तर एन. जे. गावडे व भास्कर सुतार या कर्मचाऱ्यांना डांबुन ठेवण्यात आले होते.
मारहाणीचा व्हिडीओ काढण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना देखील शेतकऱ्यांनी मारहाण केली. या घटनेचा निषेध महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन नोंदवला आहे. माढा पोलिस स्टेशनमध्ये उपळाई बुद्रुकचे सरपंच मनोज गायकवाड यांच्यासह  आठ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना समजताच महावितरणचे जिल्हा अधिक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर व बार्शीचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ताडे  हे दोन अधिकारी यांच्यासह महावितरणचे कर्मचारी माढा पोलिस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसले आहेत. आरोपींना अटक केल्याखेरीज माघारी न जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...