आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शी येथील तरूणाच्‍या जिद्दीला सलाम! शेती विकुन बनवलेल्‍या चित्रपटाची \'पिफ\' मध्ये निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) साठी बार्शीच्या अमर देवकर यांच्या ‘म्होरक्या’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या फेस्टिव्हलमधील मराठी चित्रपट स्पर्धा विभागात महाराष्ट्रातून केवळ सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यात म्होरक्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे देवकर यांनी स्वत:ची शेती विकून चित्रपट बनवण्याचे स्वप्न साकार केले.   

 
स्वस्तिक प्रीती फिल्म प्रॉडक्शन आणि अमर चित्रवाणी यांची संयुक्त निर्मिती असलेला म्होरक्या हा चित्रपट १२३ मिनिटांचा आहे. ११ ते १८ जानेवारीदरम्यान चालणाऱ्या सोळाव्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभागात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय समीक्षकांना निमंत्रित करण्यात आले आहे. नुकतेच या चि­त्रपटाच्या पोस्टरचे लाँचिंग पुण्यात झाले. कल्पकतेने नटलेल्या या पोस्टरला सोशल मीडियातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील कथानक, सिंक साउंड पद्धतीचा वापर यामुळे महोत्सवात म्होरक्या आपला ठसा उमटवेल, असा विश्वास देवकर यांनी व्यक्त केला आहे.   


म्होरक्याचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि सहनिर्माते असलेले अमर देवकर मूळचे बार्शीचे. त्यांना लहानपणापासून नाट्य, रंगभूमी, चित्रपटाविषयी आकर्षण. युवा महोत्सवात त्यांनी बनवलेल्या नाटकांना नेहमीच पारितोषिके मिळालेली आहेत. याशिवाय तीन वर्षांपूर्वी देवकर यांनी ‘आयडेंटिटी’ नावाचा लघुपट बनवला होता. या लघुपटाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...