आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१५ मध्ये अपघातानंतर भय्यू महाराज सोलापुरात आले, ती शेवटची भेट ठरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- २०१५ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी भय्यूजी महाराजांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यावेळी उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. ती त्यांची सोलापूरची शेवटची भेट ठरली. 


सोलापूरचे आणि भय्यूजी महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या सूर्योदय परिवारात अनेक साधक कार्यरत होते. सांगोला येथे त्यांनी निवासी आश्रम शाळा स्थापन करून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार उघडे केले होते. तुळजापूर तालुक्यात शाळा स्थापन केल्या होत्या. 


८ वर्षांपासून माझा परिचय 
माझे आणि भय्यूजी महाराज यांचा ८ वर्षांपासूनचा परिचय होता. मी फोन केला की ते माझी आस्थेने चौकशी करत. कालच त्यांच्याशी माझे बोलणे झाले होते. तेव्हा त्यांनी माझी अास्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे. 
- लक्ष्मीकांत ठोगे पाटील, जिल्हाप्रमुख , शिवसेना, सोलापूर