आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडे, एकबोटे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवून कारागृहात पाठवा; भीमा कोरेगावप्रकरणी आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आळंद- समाजातील घडवून आणलेल्या जातीय हिंसाचाराची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा. घटनेचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी. या घटनेला जबाबदार म्हणून हिंदू एकता समितीचे मिलिंद एकबोटे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करावी, अशा मागण्या आळंद बंद आंदोलना करण्यात आल्या. 


भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी दलित मुस्लिम समन्वय समितीच्या वतीने घोषित केलेला आळंद बंद कडकडीत शांततेत पार पडला. आळंद शहरातील सर्व व्यवहार, सरकारी खासगी वाहतूक संपूर्ण बंद होती. सकाळी सिध्दार्थ चौकात दलित मुस्लिम तरुणांचा समूह जमा होत होता. या ठिकाणच्या निवडक नेत्यांच्या भाषणानंतर दुपारी दोन वाजता आळंद बसस्थानकापासून श्रीराम मार्केटमार्गे तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. 
तहसीलसमोर सभेमध्ये पीआरपीचे नेते प्रकाश मूलभारती, दलित समन्वय समितीचे अध्यक्ष दयानंद शेरीकर, सलाम सगरी, दिलीप क्षीरसागर, जि. पं. सदस्य सिद्धाराम पॅटी, अफझल अन्सारी, भाकप नेते मौला मुल्ला, लिंगायत समाजाचे नेते बाबूराव मड्डे, मागासवर्गीय समाजाचे नेते मल्लिनाथ परेणे, दलित सेनेचे राज्याध्यक्ष हणमंत यळसंगी, मल्लिकार्जुन बोळणी, काँग्रेस नेते दत्तप्पा अटूर, राजकुमार मुदगले, शिवपुत्र नडगेरी यांनी आपले विचार मांडले. सर्वांनी देशात जातीय द्वेष निर्माण करण्यास जबाबदार असणाऱ्या संघ हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्यात यावी आदी मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या. 

बातम्या आणखी आहेत...