आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्छे दिन अालेच नाहीत, सरकारकडून दिशाभूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देशात अाणि राज्यात अच्छे दिन अाणू म्हणून अनेक अाश्वासने भाजपने दिली. पण अाज चार वर्षे झाली तरीही अच्छे दिन अाले नाहीत. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या सरकारला जनतेने धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांनी केले. दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात अाल्या.

 
जिल्हा महिला काँग्रेसचा मेळावा काँग्रेस भवन येथे अायोजित करण्यात अाला होता. त्यात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर निरीक्षक जयश्री पाटील, प्रदेश सरचिटणीस सुनेत्रा पवार, शहर महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, प्रदेश उपाध्यक्ष रेखा पाटील, हेमा पाटील, सुरेखा पाटील, सरचिटणीस कविता पाटील, नगरसेविका सीमा कुंभार, शारदा राखडे, पंचायत समिती सदस्या शालन चव्हाण, अॅड. निवेदिता अारगडे अादी उपस्थित होत्या. प्रारंभी इंदुमती अलगोंडा पाटील यांनी स्वागत केले. काँग्रेस बळकट करण्यासाठी महिलांनी पुढे अाले पाहिजे, असे अावाहन त्यांनी प्रास्ताविकेत केले. जयश्री पाटील यांनी लवकरच महिला काँग्रेसचे शिबिर घेतले जाणार अाहे. त्यात महिलांना काँग्रेसच्या कामाची अाणि सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती दिली जाणार अाहे. 


महिला अाघाडीचे पदाधिकारी 
करमाळा शहराध्यक्ष - प्रतिभा पाटील, तालुकाध्यक्ष - नंदा पाटील, पंढरपूर शहराध्यक्ष अाशा बागल, माळशिरस तालुकाध्यक्ष कुमुदिनी वगरे, जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्य- शालन चव्हाण, नफिसा शेख, सोनल ढावरे, मैना बसोडे, रेश्मा बनसोडे, इंदू गलांडे, अॅड. निवेदिता अरगडे. 

बातम्या आणखी आहेत...