आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत जिल्ह्यात रोज चार अपघात, दोघांचा जातो बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहर, जिल्ह्यात २०१४ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत रोज चार अपघात झाले असून, यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला आहे. अपघात होण्यामागे नागरिकांचे दुर्लक्ष हलगर्जीपणा या कारणाशिवाय रस्त्यांवरील खड्डे, धोकादायक वळणे अपघातानंतर मिळणारी वैद्यकीय मदत ही कारणेही कारणीभूत ठरली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विना अपघात वाहतूक सुरळीत होण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृती रस्ता सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार विजयसिंह मोहिते यांनी केले. 


जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, नामदेव चव्हाण यांच्यासह समितीचे सदस्य पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा हा जनतेच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाचा प्रश्न आहे, यासाठी यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. ज्या यंत्रणेकडे जिल्ह्यातील रस्त्यांची मालकी आहे त्या यंत्रणांनी संबंधित रस्ता सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आखून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी कार्यवाही करावी, असे खासदार मोहिते यांनी बैठकीत सांगितले.

 
अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेत मदत मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पोलिस चौकशीला बोलावतील, या भीतीने अनेकजण मदत करी नाहीत. पण अपघातग्रस्तांना वेळेत उपचारासाठी दाखल करण्यास मदत करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही चौकशीला बोलावले जाणार नाही. अपघातग्रस्त घटनांमध्ये मदत करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी समोर येण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.२०१४ मध्ये १४४६ अपघातामध्ये ५९३, २०१५ मध्ये १४३४ अपघातामध्ये ६०४, २०१६ मध्ये १२८६ अपघातामध्ये ५७८ तर २०१७ मध्ये १७७४ अपघातांमध्ये ५७२ जण मृत्युमुखी पडले आहेत. जिल्ह्यात ४४ ठिकाणे अशी आहेत, ज्यामध्ये ते १० जणांचा जीव गेला आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. 


नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करणार 
अपघात होणाऱ्या ठिकाणी फ्लेक्स, बॅनर, दिशादर्शक सूचना लावाव्यात. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर असणे आवश्यक आहे. उप प्रादेशिक परिवहन विभागाने यासाठी कार्यवाही सुरू करावी. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांना रिफ्लेक्टरबरोबर ऊस भरल्यानंतर पाठीमागील बाजूस लाल कापड लावण्याबाबत कार्यवाही करावी. हे काम येत्या आठवडाभरात पूर्ण करावे. ट्रॅक्टरसोबत ज्या ट्रॉली आहेत, त्यांना नंबर नाहीत, त्याचीही कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली. 


अपघात टाळल्यास, एसटीच्या खर्चात बचत 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतुकीच्या (एसटी) अपघाताचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प आहे. सध्या एसटीचा आर्थिक प्रवास हा अवघड झाला आहे. एसटीच्या एकूण उत्पन्नापैकी दर किलोमीटरला एक रुपया अपघातांशी निगडित गोष्टींवर खर्च होतो. अपघातांवरील हा खर्च टाळल्यास एसटीच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल, असे मत एसटी सोलापूर विभागाचे यांत्रिक अभियंता (चालन) आय. एम. वन्यालोलू यांनी मांडले. 


राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मार्गदर्शनानुसार देशभरात १० ते २५ या कालावधीत सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. बुधवारी दुपारी सोलापूर एसटी आगारात या मोहिमेचे उद््घाटन झाले, या वेळी ते बोलत होते. या वेळी विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव, विभागीय कर्मचारी वर्ग अधीक्षक औदुंबर गायकवाड, प्रभारी आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे, सुरक्षा दक्षता अधिकारी शेखर फरांदे, विभागीय लेखा अधिकारी अविनाश गायकवाड यांच्यासह एसटीचे वरिष्ठ अधिकारी चालक-वाहक, मेकॅनिक उपस्थित होते. या मोहिमे अंतर्गत विभागीय तसेच आगार पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रवाशांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. २५ वर्षांपेक्षा जास्त अपघातविरहीत सेवा देणाऱ्या चालकांचा सपत्नीक सत्कार जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी औदुंबर गायकवाड, शेखर फरांदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहायक कार्यशाळा अधीक्षक आर. बी. गवळी यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...