आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर- पंढरपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक संदीप दिलीप पवार (वय ३८) यांच्यावर रविवारी (ता.१८) दुपारी अज्ञात मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गाेळ्या झाडल्या हाेत्या, तसेच सत्तूरने वारही केले हाेते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार यांचा साेलापूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका सुरेखा दिलीप पवार, पत्नी, एक भाऊ, भावजय, दोन पुतणे आणि एक विवाहित आणि एक अविवाहित बहीण असा परिवार आहे. पवार यांचे वडील दिलीप पवार यांचा देखील २००१ मध्ये असाच खूनी हल्ल्यात मृत्यू झाला हाेता.
पंढरपूरच्या स्टेशन रस्त्यावरील श्रीराम हॉटेलमध्ये रविवारी दुपारी संदीप पवार आपल्या मित्रांसमवेत चहा घेत हाेते. याच वेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच सत्तुरसारख्या धारदार शस्त्राने देखील त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले. त्यांच्या मित्रांनी लगेचच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच आपल्या गाडीतून पवार यांना स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी दुपारी चारच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मास्क बांधून अाले हाेते अाराेपी : पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा लोक तोंडाला मास्क बांधून स्टेशनरस्त्याच्या पाठीमागील रस्त्याने दुचाकीवरून आलेले होते. यापैकी दाेन ते चार जण हॉटेलमध्ये घुसले. त्यातील एकाने पवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले तर दुसऱ्या लोकांनी अगदी जवळून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या व पलायन केले. या घटनेची माहिती कळताच शहरात तणावाचे वातावरण पसरले हाेते. दुपारनंतर मुख्य बाजारपेठ बंद झाली हाेती. दरम्यान, पाेलिसांनी हल्ला झालेल्या हाॅटेल परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करून अाराेपींचा शाेध घेण्याचा प्रयत्न चालवला अाहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.