आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला दिवस उमेदवारी अर्ज खरेदीचा, ८१ जणांनी घेतले ९५ उमेदवारी अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी इच्छुकांनी अर्जाची खरेदी केली. पण राखीव जागेवरून निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवार जात पडताळणी प्रमाणपत्रावरून संभ्रमात पडले आहेत. प्राधिकरणाच्या आदेशानुसार आम्ही जात पडताळणी प्रमाणपत्र स्वीकारणार असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केेले तर दुसरीकडे जातपडताळणी समिती सदस्य नागेश चौगुले यांनी कारण असल्याशिवाय जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी आम्हाला अर्ज स्वीकारता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे इच्छुक उमेदवार चांगलेच कोंडीत अडकले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सहकार प्राधिकरण वा जिल्हाधिकारी यांना स्वत:च्या अधिकाराखाली जातपडताळणी प्रमाणपत्र स्वीकारण्याबाबत अध्यादेश काढावा लागणार आहे. 


आरक्षणात बदल, अफवांना ऊत... 
निवडणूक कार्यालयाच्या तांत्रिक चुकीमुळे मुस्ती व बोरामणी गणाच्या आरक्षणात बदल झाला होता. यामध्ये बोरामणी इतर मागास प्रवर्ग तर मुस्ती अनुसूचित जातीसाठी अशी चूक झाली होती. मंगळवारी सायंकाळी निवडणूक कार्यालयाने आरक्षणानुसार मुस्ती इतर मागास प्रवर्ग व बोरामणी अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्याचे शुद्धीपत्रक काढले. तांत्रिक चुकीमुळे मंगळवारी दिवसभर दक्षिण तहसील कार्यालयात चर्चेला उधाण आले होते. मात्र सहायक निवडणूक अधिकारी अमोल कदम यांनी याबाबत शुद्धीपत्रक काढण्यात आले असल्याचे सांगितले. 


जातपडताळणी प्रमाणपत्र स्वीकारण्याचे आदेश 
सहकार प्राधिकरणाने तयार केलेल्या कायद्यामध्ये उमेदवारी अर्जासोबतच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे, असे स्पष्ट सूचित केले आहे. निवडणूक कार्यालयाकडून जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जावर सही व शिक्का देण्याचा प्रश्नच येत नाही. दुरुस्ती आदेश वा सूचना आल्यास जातपडताळणी अर्जावर सही, शिक्का देता येईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी सहा महिन्यांची मुदत आहे. तशी मुदत सहकार प्राधिकरणाने काढलेल्या अध्यादेशात नाही. 
- अमोल कदम, सहायक िनवडणूक अधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...