आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात विठुरायाला भक्तांनी अर्पण केलेले दागिने वितळवून सोन्याच्या विटा करण्याचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात जमा झालेले सोने आणि चांदी वितळवून त्याचा विटा बनवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. सोन्या-चांदीच्या हजारो छोट्या-मोठ्या वस्तू बाळगणे आणि त्यांची सुरक्षा करणे कठीण असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या खजिन्यात सध्याच्या घडीला 25 किलो सोने आणि 830 किलो चांदी जमा आहे. 

 


 विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाला देशभरातून दीड कोटी भाविक येत असतात. हे भक्त विठ्ठलाच्या चरणावर आपल्या ताकतीनुसार दान अर्पण करीत असतात. यात सोने आणि चांदीच्या अनेक लहान मोठ्या वस्तूंचा समावेश असतो. भक्ताकडून आलेली प्रत्येक भेट वस्तू मंदिर समिती देवाच्या खजिन्यात नोंद करून जमा करीत असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या हजारो वस्तू सांभाळणे मंदिर समितीसाठी जिकिरीचे बनू लागले आहे. 

 

 

नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. राज्य सरकारने देखील 2015 साली एक अध्यादेश काढून देवस्थानाच्या भेट आलेल्या मौल्यवान वस्तूंबाबत सूचना दिल्या आहेत. आता याचाच आधार घेऊन मंदिर समितीने देवाच्या खजिन्यात असलेल्या 25 किलो सोने आणि 830 किलो चांदीच्या वस्तू वितळवून त्याच्या विटा बनविण्यावर विचार सुरु केला आहे . 
 

बातम्या आणखी आहेत...