आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा निराधार मुलींना मदतीचा हात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आईचे छत्र हरपले, वडिलांना जन्मठेप, आजोबा हयात नाहीत, अाजीच पाच जणींचा सांभाळ करते, त्या निराधार पाच बहिणींना मदतीचा हात मिळावा, सामाजिक बांधिलकी जपली जावी, या प्रामाणिक भावनेने सिद्धेश्वर प्रशाला व कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गत वर्षीपासून त्या मुलींना शैक्षणिक साहित्य व इतर साहित्यही देत आहेत. 


माजी विद्यार्थी १९८७/८८ ग्रुप च्या वतीने बोराळे, (ता. मंगळवेढा) येथील वाघमारे कुटुंबातील पाच मुलींना यंदाच्या वर्षीही शैक्षणिक मदत केली आहे. एकामागे एक कुटुंबातील सदस्यांच्या निधनाने पाच मुली पोरक्या झाल्या होत्या. ही बातमी समजताच गतवर्षी त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत केली होती. त्याच वेळी त्या मुलींचा १० वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे ग्रुपच्या वतीने जाहीर केले होते. या पाठबळामुळे त्या निराधार मुलींना खूप आधार झाला व त्यांच्या मनामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. 

 

मुलींच्या चेहऱ्यावर स्मित
सातवीत शिकणारी मंजुळा, सहावीतली संजीवनी, चौथी इयत्तेत जाणारी मुक्ता आणि नीरा, व सगळ्यात लहान मंगला या सगळ्या बहिणींना एकत्र बोलावून अभ्यासाविषयी विचारणा केली असता, त्या चिमुरड्यांनी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्याचे सदस्यांनी सांगितले. 


पाच बहिणी आणि आजीसोबत देविदास चेळेकर, महेंद्र सोमशेट्टी, रवी ढाळगे, चंदू मुंढे, संजीव रंगरेज, उमेश डुमने, सोमशंकर चाकोते व गावकरी उपस्थित होते. 


आईचे छत्र हरवले, वडिलांना जन्मठेप तर आजोबाही मरण पावले. ६५ वर्षीय आजी पाच नातींचा संभाळ करते. त्यांना मदतीचा हात म्हणून गतवर्षीपासून सहाय्य करीत आहोत.
- देविदास चेळेकर, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना 

बातम्या आणखी आहेत...