आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांबेवाडी येथे पेपर फुटल्याची चर्चा, बाेर्डाकडून मात्र इन्कार; फुटलेला पेपर प्रश्नपत्रिकेशी जुळला नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- बारावीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजीचा पेपर बुधवारी (दि. २१) तांबेवाडी (ता.बार्शी) येथे पेपर फुटल्याची चर्चा सोशल मीडियातून पसरल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. दरम्यान, या कथित पेपरफुटीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पेपर फुटीसंदर्भात ठोस पुरावे हाती लागले नाहीत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही या चर्चेचे खंडन केले.


तांबेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक आश्रमशाळेत परीक्षा केंद्र आहे. येथे पेपर सुरू असताना दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास फुटलेले पेपर व्हायरल झाल्याचे वृत्त झळकले. त्यानंतर शिक्षण विभागासह सर्वांची एकच धावपळ उडाली. येथील गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी तातडीने तांबेवाडी केंद्रास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पेपरफुटीचा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, कथित पेपरफुटीचा प्रकार व्हायरल झाल्यानंतर सोशल माध्यमातून उपलब्ध झालेल्या पेपरच्या एका प्रतीची पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडील प्रश्नपत्रिकेशी पडताळून पाहिले असता तो जुळून आला नाही. त्यामुळे पेपर फुटल्याच्या प्रकाराचा ठोस पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही.


राज्यात ६२ गैरप्रकार
इंग्रजीच्या पेपरला राज्यात ६२ ठिकाणी काॅपी व गैरमार्ग प्रकरणाची नाेंद झाल्याची माहिती बाेर्डाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

 

ही तर अफवा
इंग्रजीचा आजचा पेपर फुटलेला नाही. त्याची माहिती मंडळ घेत आहे. ती पडताळून पाहिली जाईल. आवश्यकता भासल्यास अंतर्गत चौकशी केली जाईल. परंतु इंग्रजीचा पेपर फुटलेला नाही. पेपरफुटीची अफवा सोशल मीडियाने पसरवली. उद्याचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नये. 
- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

 
बातम्या आणखी आहेत...