आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपद्रवी प्रवाशांची 'अनुभुति', प्रवासी मनोरंजनाला मुकणार; एलसीडी, हेडफोन्स अाता रेल्वेत नसणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आता प्रवाशांना रेल्वेत प्रत्येक सीटच्या पाठीमागे बसविलेल्या छोटया स्क्रीनमधून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार नाही. कारण, उपद्रवी प्रवाशांच्या त्रासाला कंटाळून रेल्वे मंत्रालयाने ‘अनुभुति’ आणि “तेजस’सारख्या आलीशान गाड्यांमध्ये मनोरंजनाची साधने न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 


आधीपासून ही साधने असलेल्या गाड्यांत ते कायम राहतील. मात्र, नव्याने उत्पादन होणाऱ्या डब्यात ती बसवली जाणार नाहीत, असा आदेश रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व कोच फॅक्टरींना दिले असून याची तत्काळ अंमलबजावणी करावी असे सांगण्यात आले. त्यामुळे यापुढे प्रवाशांचा प्रवास मनोरंजन साधनांना  विरहित होईल.   भारतीय रेल्वेने कात टाकत पहिल्यांदाच प्रवास चांगला व आनंददायक होण्यासाठी डब्यात टिव्ही स्क्रीन व हेडफोन्ससारख्या सुविधा दिल्या होत्या. तेजस एक्सप्रेसच्या प्रतिसादानंतर रेल्वेने शताब्दी एक्सप्रेसला जोडलेल्या अनुभुति कोचमध्येही अशा प्रकारची सुविधा दिली. मात्र, उपद्रवी प्रवाशांनी देशातील विविध ठिकाणी सीटच्या पाठीमागे लावलेले स्क्रीन फोडणे, हेडफोन्स चोरुन नेण्यासारखे प्रकार केले. 


मुंबई ते कणवलीदरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्येही असेच चाेरीचे व ताेडफाेडीचे प्रकार घडल्याचे सुरुवातीलाच दिसून अाले.  रेल्वे मंत्रालयाला वेगवेगळया विभागातून अशाच संबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रेल्व प्रशासनानेे आता डब्यात अशा प्रकारची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक विभागाच्या सरव्यवस्थापकांना रेल्वेकडून यासंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.

 

तेजस आणि शताब्दीत मात्र सुविधा कायम राहतील
 मध्ये रेल्वेच्या मुंबई -कणवलीदरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस तसेच पुणे -सिकंदराबाददरम्यान धावणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये मनोरंजनासाठी टीव्ही आणि हेडफोन्सची सुविधा आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये ही सुविधा कायम राहणार आहे.

 

नव्या गाड्यांमध्ये हाेणार निर्णयाची अंमलबजावणी
विविध ठिकाणाहून रेल्वेला नासधुसीशी व तोडफोडीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने नव्याने उत्पादित होणाऱ्या अनुभुति वा तेजस एक्सप्रेसच्या डब्यात एलसीडी स्क्रीन, हेडफोन न बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
- सुनिल उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

बातम्या आणखी आहेत...