आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना मंत्रिपद हा विषय शिवसेनेसाठी नगण्य; आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नारायण राणे हा विषय आता शिवसेनेसाठी संपला आहे. राणे आणि शिवसेना यांचा कोणताही संबंध नाही. १० वर्षांपूर्वीच त्यांनी पक्ष सोडला असल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विषय नगण्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. डॉ. गोऱ्हे यांनी बुधवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे दर्शन घेतले. देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, अस्मिता गायकवाड, शाहू शिंदे आदी उपस्थित होते. 


भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यांना सुरक्षित दर्शन घेता यावे. श्रद्धा आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये, हाच बाळासाहेबांचा विचार कायम आहे. पाणी, स्वच्छतागृह आणि भाविकांचे प्रश्न यावर मागील १७ वर्षांपासून मी काम करत आहे यापुढेही करत राहणार आहे. आजपर्यंत शिवसेना जनतेच्या हिताचे काम करीत आहे. भाजपबरोबर आम्ही सत्तेत असलो तरी चुकीच्या धोरणाला विरोध राहणारच आहे. शिवसेना नेहमी स्वत:च्या विचारधारेने चालत आलेला पक्ष असल्याने स्वतंत्र विचाराने वाटचाल राहणार असल्याचे आमदार गोऱ्हे म्हणाल्या. या वेळी व्यंकटेश नंदाल, अनिल कोंडूर, संजय राठोड, अंकुश राठोड, जय पतंगे, अप्पू खरडे, राजू राठोड, लक्ष्मण जाधव, संदीप राठोड आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...