आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- ‘अमृता वहिनी हाय हाय.... भाजप सरकारचा िधक्कार असो’ अशा घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी रविवारी साेलापुरातील पार्क मैदानावर अांदोलन केले. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता हा प्रकार घडला. महिला बचत गटाच्या उत्पादनांना शासनाच्या विक्री केंद्रात स्थान देण्यात यावे तसेच रिकाम्या हाताला काम द्यावे, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, अांदाेलकांना राेखणाऱ्या पाेलिसांची आणि महिला कार्यकर्त्यांची झटापट झाली. त्यानंतर पाेलिसांनी २८ महिलांना ताब्यात घेऊन नंतर साेडून दिले.
पार्क मैदानावर रविवारी पतंजली योग समितीतर्फे महिला दिनाचा कार्यक्रम अायोजिण्यात अाला होता. त्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप खासदार हेमामालिनी अाणि योगगुरू रामदेव बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ६०-७० महिला कार्यक्रर्त्या त्या ठिकाणी घोषणा देत अाल्या. प्रवेशद्वाराजवळ पाेलिसांनी आंदोलक महिलांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अाणखीच गोंधळ वाढला. बचत गटाच्या उत्पादनांना शासनाच्या विक्री केंद्रात स्थान मिळावे यासाठी अमृता फडणवीस यांना भेटून निवेदन देणार होते. मात्र घोषणाबाजीमुळे गोंधळ वाढत गेल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या अांदाेलनात जयश्री पाटील, जयश्री माडगुळकर, राजश्री लिंबाळे, सुनीता रोटे, करुणा काशीद अादी ६०-७० महिलांचा यात सहभाग होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.