आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळ तालुक्यात नवविवहितेचा पाण्यात बुडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ- पोहता येत नसताना शेततळ्यात पोहण्यास उतरलेल्या १८ वर्षांच्या नवविवहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील बैरागवडी येथे शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. 

 

राहुल व्यवहारे, रा. बैरागवाडी हे पत्नी माया हिच्यासोबत शेळ्या राखण्यासाठी शेतात गेले होते. राहुल शेळ्या राखत पुढे गेले असताना माया हिने शेततळ्यात पडून मृत झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. 

 

 

दुसऱ्या घटनेत, कामती खुर्द (ता. मोहोळ) येथील एकाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. सुहास राचप्पा पाटील (वय ४२, रा. कामती खुर्द) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सुहास बँकेतून पैसे काढण्यासाठी म्हणून ते घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. शनिवारी विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

बातम्या आणखी आहेत...