आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा कोटी खर्चूनही उद्याने उजाड, नवीन 8 साठी 2.60 कोटी मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजनेंतर्गत तीन वर्षापूर्वी शहरातील १३ उद्यानांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यासाठी ६.२५ कोटी खर्च झाले. त्यापैकी एक ते दोन बागा वगळता अन्य बागांची योग्य देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. महापालिकेकडे देखभालीचे नियोजन नसल्याने उद्याने ओस पडत असताना आता पुन्हा केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील हरित क्षेत्र विकास प्रकल्पाअंतर्गत २.६० कोटी रकमेतून आठ बागांच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव आणला आहे. विकासाच्या नावाखाली निधीची तरतूद करायची, मक्तदारांना मोठे करायचे. नंतर देखभाल दुरुस्तीबाबत उदासीन भूमिका घ्यायची, असे महापालिकेच्या कामकाजाचे धोरण दिसते. 


शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेसमोर शहरात नवीन होणाऱ्या आठ उद्यानाचा विषय आहे. यापूर्वी नगरोत्थान योजनेतून शहरातील १३ बाग सुशोभीकरण केले. त्यासाठी ६.२५ कोटी खर्च केले. डाॅ. आंबेडकर उद्यान वगळता अन्य एकही उद्यानात हिरवळ नाही. 


देखभालीची तरतूद करू 
उद्यानाच्या विषयात देखभालीची तरतूद नाही. त्यात काही त्रुटी आहेत. ते दुरुस्त करून देखभालीची जबाबदारी उद्यान विभागावर देऊ. 
- संजय कोळी, सभापती, स्थायी समिती 


या ठिकाणी नवीन उद्याने 
गंगा नगर ओपन स्पेस, कस्तुरबा बाग, विद्यानगर ओपन स्पेस, शहा उद्यान, वसंत विहार ओपन स्पेस, विडी घरकुल ओपन स्पेस, सदिच्छा नगर ओपन स्पेस, जानकी नगर फेस २, ३९.९७ लाख तरतूद बांधकामासाठी आहे. 


जुन्या उद्यानात हिरवळीसाठी तरतूद, रक्कम लाखात 
विद्यानगर आणि शहा उद्यान - ६४.१८, वसंत विहार, विडी घरकुल, सदिच्छा नगर - ३६.०८, जानकीनगर - २९.७१, गंगा नगर, कस्तुरबा बाग - ५९.९८,आसरा पूल ते मजरेवाडी गेट येथे वृक्षारोपण करणे - २९.६७.

बातम्या आणखी आहेत...