आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीची आज सभा; सभापती, उपसभापती निवड; माने सभापती तर उपसभापती जितेंद्र साठे शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संचालकांची सभा सोमवारी सकाळी ११ वाजता बोलावण्यात आली आहे. प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत नवे सभापती, उपसभापती निवडले जातील. माजी आमदार दिलीप माने यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित झाल्याचे समजते. उपसभापतिपदासाठी जितेंद्र साठे, वसंतराव पाटील आणि श्रीशैल नरोळे यांची नावे चर्चेत आहेत. उत्तर तालुक्याला सभापतिपद मिळाले तर दक्षिणला उपसभापतिपद देण्याची परंपरा आहे. त्यानुसारच निवड होईल, असे एकंदरीत दिसून येते. 


अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या जोडभावी पेठेतील निवासस्थानी रविवारी सायंकाळी नव्या संचालकांची बैठक झाली. तीत नावे निश्चित झाल्याचे समजते. परंतु ते सोमवारी दुपारी दोन वाजताच स्पष्ट होईल. सकाळी अकरा वाजता अर्ज दाखल करणे, त्यानंतर छाननी आणि माघार अशी प्रक्रिया आहे. परंतु दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेकच अर्ज आल्यास ही निवडणूक अविरोध होईल. पुढील विधानसभा निवडणूक समोर ठेवून सभापतिपद श्री. माने यांना देऊ केल्यास त्यांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. त्यांच्यानंतर बाळासाहेब शेळके यांचेच नाव आहे. या बाबी साेमवारी सभा सुरू होण्यापूर्वीच ठरतील, असे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...