आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTP विचारुन 90 हजारांची फसवणूक; EMI कार्ड देण्याच्या बहाण्याने मागितली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ओटीपी विचारून 90 हजार 120 रुपयांची ऑनलाईन खरेदी करत फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बजाज फायनान्समधून बोलतोय असे सांगत मोबाईलवर फसवणूक करणाऱ्याने ओटीपी विचारला.

 

 

पंकज रघुनाथ शिंपी (वय 55, रा. तारांगण अपार्टमेंट, दमाणीनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शिंपी यांच्या मोबाईलवर व्यक्तीने फोन केला. मुंबईतून बजाज फायनान्समधून बोलतोय असे सांगितले. तुम्ही बजाज फायनान्सकडून एक वस्तू खरेदी केली आहे. तुम्हाला नवीन ईएमआय कार्ड द्यायचा आहे. तुम्हाला मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस येईल. एसएमएसमधील ओटीपी क्रमांक द्यायचा आहे असे सांगून ओटीपी क्रमांक घेतला. तुम्हाला तीन दिवसात ईएमआय कार्ड मिळेल असे सांगितले. त्यानंतर फ्लिपकार्ड या कंपनीकडून शिंपी यांच्या बॅंक खात्यावरून 90 हजार 120 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. पोलिस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...