आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर- समाज परिवर्तनासाठी संत, महंतांसह धर्माचार्यांनी भेदाभेदांच्या बाहेर पडून काम करावे. जैविक शेती, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, आरोग्य याप्रश्नी कार्य वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. घरवापसीमुळेच पूर्वांचलातील राज्ये सुरक्षित राहिल्याचे सांगत अयोध्येत दुसरे काही होणार नाही, राम मंदिरच होईल याचा पुनरूच्चार केला. गुरुवारी (दि. १९) संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या संत संगम कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ.भागवत म्हणाले, सरकार सेवक आहे. ते आपल्या तंत्राने चालवले पाहिजे. समाज जागा झाल्यास अनिष्ट घटनांना पायबंद बसेल. अाध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींनी यात लक्ष घातल्यास देश विश्वगुरू बनेल. घरवापसींमुळे पूर्वांचलातील राज्ये सुरक्षित राहू शकली. भारतीय संस्कृती, परंपरा यांच्याविषयी चिंता करण्याची आवश्यकता आहे. समाज जागरणातूनच राम मंदिर होणार आहे. अयोध्येत राम मंदिरच होईल. दुसरे काही होणार नाही. १५८६ मध्ये राम मंदिर तोडल्यापासून संघर्ष सुरू आहे. तेथे मंदिर होते हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. संघाने केलेल्या जागरणामुळेच याप्रश्नी हिंदू समाज जागा झाला.
...तर देशविघातक शक्ती सक्रिय झाल्या असत्या
तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या एका भेटीचा संदर्भ देताना भागवत म्हणाले, तेव्हा घरवापसीचा विषय खूप चर्चेत होता. तेव्हा मुखर्जी म्हणाले, वनवासी कल्याण आश्रमाने घरवापसी केली नसती तर आज पूर्वांचलातील ३० टक्के हिंदू समाज देशविघातक चळवळीत सक्रिय झाला असता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.