आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर बाजार समिती गैरव्यवहार: जामीन मिळालेल्या संचालकांना न्यायालयात हजर राहण्याचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकारणात १७ जणांना अंतरिम अटकपूर्व मंजूर अाहे. त्यांच्यासह नऊ जणांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. जी. हेजीब यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, बाजार समितीचे माजी पदाधिकारी दिलीप माने, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा पाटील यांच्यासह १७ जणांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला असून त्यांना बुधवारी सुनावणी न्यायालयात हजर राहण्याचे अादेश अाहेत. 


तत्कालीन संचालक मंडळांनी ३९ कोटी ६ लाखांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली अाहे. मानेंसह १७ जणांना अंतरिम जामीन मिळाला अाहे. नऊ जणांनी अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला अाहे. मंगळवारी सरकारी वकिलांनी सर्व संचालक, सभासद यांना न्यायालयात हजर राहण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने हजर राहण्याचे अादेश दिले अाहेत. सरकारतर्फे अॅड. प्रदीपसिंग रजपूत, फिर्यादीतर्फे उमेश भोजने, संचालक मंडळातर्फे धनंजय माने, मिलिंद थोबडे, बी. डी. कट्टे, शशी कुलकर्णी, अभिजित इटकर या वकिलांनी काम पाहिले. 

 

बातम्या आणखी आहेत...