आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एसपीएम'ने दृष्टीहीन लोकांसाठी तयार केला प्रकल्प; ध्वनीवर आधारित ई मेल इंटरनेट सिस्टिम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एसपीएम पॉलिटेक्निक, कुमठे येथील संगणक शास्त्र विद्यार्थ्यांनी दृष्टीहीन, अंध व्यक्तींसाठी ध्वनीवर आधारित ई मेल इंटरनेट सिस्टिम तयार केली. 


आधुनिक तंत्रज्ञान अर्थात इंटरनेटच्या वापरामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. संवाद साधणे ही मनुष्याची गरज बनली आहे. जगभर इंटरनेटचा वापर करून संवाद साधला जातो. दृष्टीहीन, अंध व्यक्तींनाही हे तंत्रज्ञान वापरता येण्यासाठी व्हाईस बेस्ड ई मेल सिस्टिम प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडला. प्रा. शिल्पा भडकंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सानिका केंदे, शीतल कोडवान, वैष्णवी मोरे, रविकिरण कोटा यांनी हा प्रकल्प तयार केला. व्यक्तीच्या बोलण्यावरून ई मेल मेसेज टाईप होतो. स्वत:ची संपूर्ण माहिती ही व्यक्ती स्वत: संगणकात भरू शकतो. ई मेल वाचण्यासाठी ध्वनी रूपांतरण करण्यात आले आहे. माहितीमध्ये बदल करण्यासाठी पासवर्ड सुविधाही देण्यात आली आहे. हे सर्व बदल ध्वनीवर आधारित आहेत. 


एसपीएम पॉलिटेक्निकमधील विद्यार्थी सानिका केंदे, शीतल कोडवान, वैष्णवी मोरे, रविकिरण कोटा यांनी अंध व्यक्तींनाही वापरता येऊ शकेल, असे व्हाईस बेस्ड ई मेल सिस्टिम हा प्रकल्प तयार केला. 

बातम्या आणखी आहेत...